निसर्गातील अनेक गोष्टींबाबत आपल्याला कुतूहल वाटते. कधी आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची भुरळ पडते, तर कधी निसर्गाचे रौद्र रूप पाहून आपण थक्क होतो. पाण्याला रंग का नसतो? झाडांच्या पानांचा रंग हिरवा का असतो असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. असाच एक प्रश्न सर्वांना पडतो तो म्हणजे सर्व ग्रहांचा आकार गोलाकार का असतो?

साधारण सर्व ग्रहांचा आकार गोलाकार असल्याचे तुम्ही पाहिले असेल, पण ग्रह इतर कोणत्याही आकाराचे का नसतात? फक्त गोलाकार का असतात? असा प्रश्न याबाबत आपल्याला पडतो. याबाबत विज्ञान काय सांगते जाणून घ्या.

Trigrahi Yog in Meen Rashi
३ ग्रहांची महायुती होताच घडणार त्रिग्रही योग; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Why we must be aware of the ill effects of consuming palm oil and which alternatives to choose Read What Expert Said
पॅकबंद पदार्थांतील ‘पाम तेल’ तुमच्यासाठी हानिकारक? पाहा तज्ज्ञ काय सांगतात…

ग्रहांचा आकार पुर्ण गोलाकार नसतो
आपल्याला जरी सर्व ग्रह गोलाकार दिसत असले, तरी ग्रहांचा आकार पुर्ण गोलाकार नसतो. ध्रुवांजवळ ग्रहांचा आकार निमुळता तर मध्यभागी फुगवटा असल्याप्रमाणे मोठा असतो.

आणखी वाचा: पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिले जाते रेल्वे स्टेशनचे नाव? जाणून घ्या यामागचे कारण

गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव
शास्त्रज्ञांच्या मते गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे ग्रहांचा आकार गोलाकार असतो. गुरुत्वाकर्षणामुळे कोणतीही वस्तु केंद्रबिंदूजवळ आकर्षित होते. त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असल्याने ग्रहाचे घटक त्याच्या गाभ्याशी जोडलेले राहतात. यामुळे ग्रहांचा आकार गोलाकार असु शकतो. यासह ग्रह सतत सुर्याभोवती फिरत असतात, त्यामुळे त्यांच्या या फिरण्याच्या वेगाचाही त्यांच्या आकारावर परिणाम होतो. ग्रहांचा फिरण्याचा वेग जितका जास्त असेल, तितका ग्रहांचा पृष्ठभाग सपाट करण्याचा प्रयत्न केला जातो. अशाप्रकारे या कारणांमुळे ग्रहांचा आकार गोलाकार असतो.