Premium

सेल आणि मॉलमधील वस्तूंच्या किमती ९९ किंवा ९९९ अश्या का असतात? जाणून घ्या कारण…

वस्तूंच्या टॅगवर ९९ किंवा ९९९ या किमती का असतात ते पाहू…

Why are prices of items in sale and mall end with 99 and 999 must read
(फोटो सौजन्य: unplash/ लोकसत्ता.कॉम) सेल आणि मॉलमधील वस्तूंच्या किमती ९९ किंवा ९९९ अश्या का असतात? जाणून घ्या कारण…

मॉल, दुकाने, ऑनलाइन सेल आदी ठिकाणांहून आपण अनेकदा बऱ्याच गोष्टी खरेदी करतो. पण, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, सेल किंवा ऑफरदरम्यान मिळणारे कपडे, वस्तू यांच्यावर किमतीचा टॅग असतो. तर हा टॅग ९९ किंवा ९९९ या क्रमांकानेच संपतो. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, की प्रत्येक वस्तू फक्त ९९ रुपयांना किंवा या किमतीचा शेवट ९९९ रुपयांनी का होत असेल ? तर आज आपण या लेखात या मागचे कारण समजून घेणार आहोत. वस्तूंच्या टॅगवर ९९ किंवा ९९९ या किमती का असतात ते पाहू…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी असे गृहीत धरले जात होते की, कंपन्या काही कर समस्यांसाठी ही योजना वापरतात. पण, नंतर असे दिसून आले की, ९ आणि ९९ क्रमांक ठेवण्याची ही प्रथा ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी आहे. सेलदरम्यान वस्तूच्या किमती व जे लेबल लावलेले असते ते प्रामुख्याने आपल्याला रुपये ९९ असे लिहिलेले दिसते. अशातच ग्राहक वस्तू विकत घेताना त्या लेबलवरच जास्त लक्ष देत असतात.

९९ किंवा ९९९ किमती करतात आकर्षित :

९९, ९९९ या वस्तूंवरील किमती ग्राहकांना आकर्षित करतात. एखादा विक्रेता एखादी वस्तूची किंमत १०० रुपयांऐवजी ९९ रुपये ठेवतो, तेव्हा ग्राहकाला विश्वास दिला जातो की, ही वस्तू स्वस्त आहे. उदाहरणार्थ : जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत २०० रुपये असते, तेव्हा खरेदीदाराला वाटते की, १०० रुपयांपर्यंत आपण ही वस्तू विकत घ्यायला हवी. इतकेच काय, तर ग्राहक वस्तूंच्या किमतीमधील पहिल्या काही अंकांकडे बारकाईने लक्ष देतो. एखाद्या उत्पादनाची किंमत ९९९ रुपये आहे असे त्यांना दिसल्यास, त्यांच्या मनात आपोआपच एक चित्र तयार होईल की, ते एक रुपयाची कपात करून १००० रुपयांपेक्षा कमी किमतीत आपण ही वस्तू खरेदी करत आहेत.

हेही वाचा…ट्रेनचे तिकिट बुकिंग सुरु झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आणि शेवटी कोणती सीट बुक केली जाते?

९९ किंवा ९९९ किमती ग्राहकांसाठीही फायदेशीर :

९९ ला विकल्या जाणाऱ्या वस्तूमुळे दुकानदाराला एक महत्वाचा फायदासुद्धा होत असतो. यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया. जर एखादा ग्राहक ९९९ रुपयांचे सामान खरेदी करत असेल, तर अशावेळी आपण कॅश पेमेंट करतो त्यावेळी १००० रुपये आपण दुकानदाराला देतो. अनेकदा तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की, अनेक दुकानदार उरलेला एक रुपया तुम्हाला परत करत नाहीत, त्याचबरोबर ग्राहकसुद्धा उरलेला एक रुपया त्यांच्याकडून मागत नाही. अनेकदा असे होते की, दुकानदार एक रुपयाच्या बदल्यात तुम्हाला एखादे चॉकलेट देत असतात. अशाप्रकारे दुकानदार एक रुपया वाचवत असतात व याच पैश्याने आपले एखादे दुसरे उत्पादनसुद्धा ग्राहकांना विकत असतात. म्हणूनच ही खास पद्धत मार्केटमध्ये वापरण्यात येते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why are prices of items in sale and mall end with and 9 must read asp

First published on: 30-11-2023 at 20:54 IST
Next Story
वाहनांच्या नंबर प्लेटवर कोपऱ्यात IND का लिहिलेलं असतं? यामागे काय आहे कारण?