Why Chips Packet Has Air: अगदी लहानांपासून आजी आजोबांच्या वयातील लोक सुद्धा चिप्स खाताना आपण पाहतो. लहान मुलांच्या आवडत्या पदार्थांमध्ये चिप्सचा समावेश असतोच. पण तुमच्या डोक्यात कधी हा विचार आलाय का, हे चिप्स जेव्हा आपण डिश मध्ये खाण्यासाठी घेतो किंवा पॅकेट उघडतो तेव्हा बाहेरची हवा लागून ते नरम पडण्यास सुरुवात होते. परंतु हेच चिप्स एका हवा असलेल्या पॅकेट मध्ये असताना नरम होऊन खराब होत नाहीत. तेव्हा मात्र ते कुरकुरीत कसे बरं राहत असतील?

चिप्सच्या पाकिटात चिप्सपेक्षा हवाच जास्त भरलेली असते. यावरून आजवर कित्येक मीम्स आपणही पाहिले असतील. पण मुळात यामागचे कारण काय आणि चिप्स हवा असताना नरम का पडत नाहीत याचे उत्तर आपण पाहूया..

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल

चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरली जाते? (Why Chips Packet Has Air)

चिप्स हे खूप नाजूक असतात आणि जर ते पॅकेट पूर्णपणे भरले गेले तर ते आपल्या जवळ पोहचण्याअगोदरच पॅकिंग, डिलिव्हरी प्रक्रियेतच तुटू शकतात. पॅकेट पॅक केल्यापासून ते बाजारात येऊन आपल्या हातात मिळेपर्यंत चांगले राहण्यासाठी आणि त्याचा चुरा होऊ नये म्हणून चिप्सचे पॅकेट अर्धेच भरलेले असते.

हे ही वाचा<< ट्रेनमध्ये पंख्यांच्या बाजूला छोटी छिद्रे का असतात? प्रवाशांसाठी करतात ‘हे’ मोठे काम, नसतील तर…

चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा असतानाही चिप्स नरम का पडत नाही?(Why Chips Don’t Soften In Air)

चिप्सच्या पॅकेट मध्ये भरली जाणारी हवा ही नायट्रोजन गॅस पासून भरलेली असते हि हवा चिप्स खराब आणि नरम पडू देत नाहीत . ज्यावेळी आपण ते पॅकेट फोडतो तेव्हा ते ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने हळूहळू नरम पडू लागते. रीडर्स डाइजेस्ट च्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आणि १९९४ वैज्ञानिकांच्याच्या संशोधनाच्या माहितीनुसार, चिप्स बनवणाऱ्या कंपन्या ह्या चिप्स ताजे राहून ते नरम पडू नये म्हणून नायट्रोजन गॅस भरतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा गॅस भरल्यामुळे चिप्सच्या चवीत देखील वाढ होत असल्याचे म्हटले जाते.