Why Clouds Don’t Fall On Land: थंडीत अलीकडे सकाळी बेडवरुन उठायची इच्छा होत नाही हे सगळेच मान्य करतील. पण जर का तुम्ही सकाळी थंडीत बाहेर जाऊन कधी आकाश पाहिलंत तर ढगांचा सुंदर नजारा पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळू शकतं. पहाटे स्वच्छ निळ्या आकाशात तरंगणारे पांढरेशुभ्र ढग पाहताना मनात अनेक विचार येतात. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, पृथ्वीवर पॉवरफुल गुरुत्वाकर्षण शक्ती असताना हे ढग खाली कसे पडत नाहीत? यावर पहिलं उत्तर मनात येतं ते म्हणजे ढग काय हवेसारखे नाजूक व हलके असतात त्यांना तरंगायला काय हरकत आहे? पण हे उत्तर चुकीचे आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार ढग हलके दिसत असले तरी एका ढगाचे वजन जवळपास १००० किलोपर्यंत असू शकते. मग हे इतकं वजन हवेत कसे काय टिकून राहते हे आज आपण पाहणार आहोत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ढग कसे तयार होतात?

डीडब्ल्यूच्या रिपोर्टनुसार, वातावरणात गॅसरूपी पाण्याची वाफ उपस्थित असते. हा गॅस पारदर्शक असल्याने आपण पाहू शकत नाही. जेव्हा पाण्याची वाफ असणारी हवा पृथ्वीच्या कक्षेत वरच्या बाजूस जाते तेव्हा ती गरम हवा थंड होऊ लागते व हवा अजून वर जात राहिल्यास हवेचे म्हणजेच त्यातील जलबाष्पाचे तापमान द्रवांकाच्याही खाली जाऊन पाण्याचे थेंब तयार होतात. असे असंख्य जलबिंदू एकत्र आल्यावर त्यांचा दृश्य स्वरूपातला ढग तयार होतो.

एका ढगाचे वजन किती असते?

जेव्हा तुम्ही ढग जमिनीवरून पाहता तेव्हा ते अगदी हलके-फुलके वाटतात पण मुळात ढंगाचे वजन आपल्या अपेक्षेहून कित्येकपट अधिक असते. गरम हवेने बनलेल्या एका ढगाचे वजन काही टन म्हणजेच हजारो किलो असू शकते.

ढगाचे वजन कसे मोजतात?

साहजिकच ढगाचे वजन मोजण्यासाठी कोणतं मशीन नाही. सॅटेलाईटच्या रडारवरून ढगांमध्ये काही लहरी सोडल्या जातात ज्यावरून ढगांच्या आद्रतेचे प्रमाण समजते. आद्रतेवरून ढगात किती पाणी असेल हे समजते व त्यावरून वजनाचा अंदाज लावला जातो.

हे ही वाचा<< ‘या’ ठिकाणी पडतो खऱ्या हिऱ्यांचा पाऊस; आकाशातून डायमंड बरसण्यामागचं विज्ञान जाणून घ्या

ढग पृथीवर पडत का नाहीत?

ढगांमध्ये असणारी पाण्याचे थेंब इतके लहान असतात की गरम हवा त्यांना आरामात वर तरंगत ठेवते. उवाढत नाही तोपर्यंत दाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या भांड्यात पाणी गरम करता आणि मग त्यावर एक झाकण ठेवता त्या झाकणाला पाण्याचे थेंब चिकटून राहतात जोपर्यंत एक दोन पाण्याचे थेंब एकत्र येऊन त्यांचे वजन वाढत नाही तोपर्यंत ते पाण्याचे थेंब खाली पडत नाहीत. याच पद्धतीने जोपर्यंत ढगातील पाण्याचे थेंब अधिक जड होत नाहीत तोपर्यंत ते हवेतच तरंगत राहतात. आणि पाण्याचे वजन वाढल्यास पाऊस पडून ढग मोकळे होतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why clouds do not fall on land due to gravity how 1000 kg cloud stay up in air svs
First published on: 21-01-2023 at 17:53 IST