scorecardresearch

Premium

९९ टक्के कुत्रे गाडीचे टायर, खांब, अशा उभ्या वस्तूंवर लघवी का करतात? एक्सपर्टचं उत्तर वाचून व्हाल थक्क

Do You Know: तुम्ही अनेकदा पाहिलं असेल आपण कुत्र्यांना घरात ठेवण्यासाठी टॉयलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय त्यांनी घरभर कुठेही घाण करून ठेवू नये एक ठिकाण नेमून देण्याचा आपला प्रयत्न असतो पण..

Why Dogs Only Pee on Car Bike Tyres Can We Get Rid Of Urination Bad Smell Animal Health expert Tells Weird Reason
कुत्रे गाडीचे टायर, खांब, अशा उभ्या वस्तूंवर लघवी का करतात? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Amazing Fact About Dogs: माणसाचा प्रामाणिक मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांवर अनेकजण अगदी जीवापाड प्रेम करतात. आपल्याला लहान बाळाला सांभाळावं तसं कुत्र्यांचं संगोपन केलं जातं. बोलता येत नसल्याने लहान मुलांच्या अनेक गोष्टींविषयी आपल्याला माहित नसतं तसाच काहीसा प्रकार हा या मूक प्राण्यांबाबतही घडतो. एखाद्या परिस्थितीत आपले पाळीव डॉग नेमके काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण आपल्याला तात्यांचा संकेत कळू शकत नाही. किंवा अनेकदा त्यांच्या एखाद्या सवयीचा उलगडा होत नाही. आज आपण कुत्र्यांची अशीच एक सवय व तिच्यामागचं कारण जाणून घेणार आहोत.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल आपण कुत्र्यांना घरात ठेवण्यासाठी टॉयलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय त्यांनी घरभर कुठेही घाण करून ठेवू नये एक ठिकाण नेमून देण्याचा आपला प्रयत्न असतो पण तरीही कुत्रे बहुतांशवेळा घराच्या कपाटावर किंवा गाडीच्या टायरवर लघवी करतात. डॉग एक्सपर्टच्या माहितीनुसार कुत्रे आपले क्षेत्र म्हणजेच टेरिटरी मार्क करण्यासाठी असं करत असल्याचे म्हटले जाते. इतकंच नव्हे तर याच गंधातून कुत्र्यांनी जोडीदार किंवा मित्रांसाठी पाठवलेला हा संकेत असतो.

Cozy Cardio
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
sacrificing animals in public Video Viral
माणुसकीला काळीमा! सर्वांसमोर देत होता मुक्या प्राण्याचा बळी, महिलेने अडवताच दिली धमकी, धक्कादायक VIDEO व्हायरल
Maruti Car Waiting Period
५.९९ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, छप्परफाड विक्रीमुळे वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर
how long it will take the pot to fill with drops of water man unique experiment to find the answer
Video : पाण्याच्या थेंबांनी मडकं भरायला किती वेळ लागेल ? तरुणाने प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी केला अनोखा प्रयोग

हे ही वाचा<< ‘BRA’ या शब्दाचा फुल फॉर्म वाचून व्हाल थक्क! ब्रा कप साईझ ठरवणारी पहिली कंपनी व अनेक न ऐकलेल्या गोष्टी…

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुत्रे बहुतांश वेळा उभ्या गोष्टींवरच का लघवी करतात. कुत्र्यांना उभं राहिल्यावर न वाकता किंवा बसता ज्या उंचीपर्यंत वास घेता येतो तितक्या उंचीवर ते लघवी करतात. शिवाय जमिनीवर पाण्याने किंवा धुळीने हा गंध काही वेळाने नाहीसा होऊ शकतो पण धातूचे खांब किंवा रबरी टायरवर गंध अधिक काळ तसाच राहतो. म्हणूनच थेट जमिनीवर लघवी न करता कुत्रे खांब, गाडीचा उंच टायर, कपाट इत्यादी उभ्या गोष्टींवर/वस्तूंवर लघवी करतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why dogs only pee on car bike tyres can we get rid of urination bad smell animal health expert tells weird reason svs

First published on: 15-06-2023 at 10:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×