Why the Indian police uniform is Khaki in colour : आपल्या देशात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस २४ तास काम करतात. देशाचा महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांची ओळख म्हणजे खाकी वर्दी. दूरवरून आपल्याला खाकी वर्दी दिसली की आपण लगेच पोलिसांना ओळखतो. पण, याचा अर्थ असा नाही की पोलिस फक्त खाकी रंगाचाच गणवेश परिधान करतात. काही ठिकाणी पोलिसांचा गणवेश पांढऱ्या रंगाचासुद्धा आहे. पण हे खरंय की, सहसा आपल्या देशात पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला का, की पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच का असतो? या रंगामागे काय कारण आहे? आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच का असतो?

ब्रिटीश भारतात आले तेव्हा भारतीय पोलि‍सांचा गणवेश खाकी रंगाचा नव्हता तर पांढरा रंगाचा होता पण या पांढऱ्या रंगाच्या गणवेशाची एक समस्या होती की जेव्हा पोलिसांना खूप दूरवर ड्युटी असेल तर हा पांढरा रंगाचा गणवेश लवकर खराब होत असे. यावर तोडगा म्हणून पुढे ब्रिटीश अधिकार्‍यांनी गणवेश बदलण्याची योजना आखली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी एक रंग तयार केला, तो रंग ‘खाकी’ होता. हा रंग तयार करण्यासाठी चहाच्या पानांचा वापर केला जात असे. अशाप्रकारे हळूहळू पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढऱ्यापासून खाकी करण्यात आला. खाकी रंग हा हलका पिवळा आणि तपकिरी रंगाचे मिश्रण आहे. आता मात्र सिंथेटिक रंगांपासून (केमिकलपासून बनवले जाणारे रंग) खाकी रंग तयार करतात.

हेही वाचा : WhatsApp वारंवार हँग होतंय? स्टोरेज Full झाल्याने अ‍ॅप वापरण्यात अडचण येतेय? ‘या’ सेटिंग्ज बदला

देशाच्या स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपूर्वी म्हणजेच १८४७ रोजी नॉर्थवेस्ट फ्रंटियरचे गव्हर्नर एजंट सर हेन्री लॉरेन्स (Sir Henry Lawrence) यांनी खाकी रंगाचा गणवेश परिधान केलेले पोलिस पाहून अधिकृतपणे पोलिसांचा गणवेश म्हणून खाकी रंग स्वीकारला. लॉरेन्स यांनी डिसेंबर १८४६ मध्ये लाहोरमध्ये ‘कॉर्प्स ऑफ गाईड फोर्स’ची (‘Corps of Guide Force’) स्थापना केली. ‘कॉर्प्स ऑफ गाईड फोर्स’हे ब्रिटीश भारतीय सैन्याची एक रेजिमेंट होती, जी उत्तर-पश्चिम सीमेवर काम करायची. विशेष म्हणजे भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला तरीसुद्धा ब्रिटिशांच्या काळात बदललेला खाकी रंगाचा गणवेश आजही वापरला जातो.

केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) हे देशातील सर्वात मोठे दल, केंद्रीय राखीव पोलिस दलाला एक वेगळी ओळख देण्यासाठी या दलातील पोलिसांचा खाकी गणवेश बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is khaki color chosen for the indian police read history of at one time the police uniform was white who changed and why ndj
Show comments