Lawyers Black Coat: वकील नेहमी काळा कोट घालत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. न्यायालयात किंवा त्यांच्या ऑफिसमध्येही ते काळा कोट वापरत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण यामागे काय कारण आहे हे बऱ्याच जणांना माहित नसते. तुम्हाला याबाबत एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की आधी वकील काळ्या रंगाचे कोट वापरत नसत, पण इतिहासात एक अशी घटना घडली तेव्हापासून सर्व वकील काळा कोट वापरू लागले. कोणती आहे ती घटना जाणून घ्या.

१३२७ मध्ये झाली वकील या क्षेत्राची सुरूवात

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

१३२७ मध्ये एडवर्ड ||| ने या क्षेत्राची सुरूवात केली. तेव्हा ड्रेस कोडनुसार वकिलांचे पोशाख तयार करण्यात आले. तेव्हा न्यायाधीश डोक्यावर विग घालत असत. सुरूवातीच्या काळात वकिलांचे चार प्रकार होते. विद्यार्थी, वकील, बेंचर आणि बॅरिस्टर असे चार प्रकार होते.

आणखी वाचा: भारतात फक्त ‘या’ ठिकाणी चारही बाजूने येते रेल्वे; महाराष्ट्रातील जागेचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

पोशाखात बदल झाला
आधीच्या काळात सोनेरी लाल आणि तपकिरी रंगाचा गाऊन घातला जात असे. नंतर १६०० मध्ये वकिलांच्या पोशाखात बदल करण्यात आला. त्यानंतर १६३७ मध्ये काउन्सिलने सामान्यांप्रमाणे पोशाख करावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर वकिलांनी लांब गाऊन घालण्यास सुरुवात केली, यामुळे वकील आणि न्यायाधीश इतरांपेक्षा वेगळे वाटत होते, असे मानले जाते.

काळा कोट वापरण्याची सुरूवात कशी झाली?
ब्रिटनची राणी मेरी यांचा १६९४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती किंग विल्यम्स यांनी सर्व न्यायाधीश आणि वकिलांना सार्वजनिकपणे शोक करण्यासाठी काळ्या गाऊनमध्ये एकत्रित येण्याचे आदेश दिले. हा आदेश कधीच मागे घेण्यात आला नाही त्यामुळे तेव्हापासून आजतागायत वकील काळा गाऊन घालतात.

आणखी वाचा: केळ्यांचा आकार सरळ का नसतो? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित

आताच्या काळात काळा कोट वकिलांची ओळख बनला आहे. १९६८ च्या कायद्यानुसार न्यायालयांमध्ये पांढरा बँड टायसह काळा कोट वापरणे वकिलांसाठी बंधनकारक आहे. न्यायाप्रती विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी काळा कोट वकिलांची मदत करतो असे मानले जाते.