Why Chinese Men Are Wearing Bra-Panties: चीनमधील जिनपिंग सरकार मागील काही वर्षात सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आलं आहे. चीनमधून पसरलेला करोना व्हायरस असो किंवा पाकिस्तानशी मैत्रीअसो अनेक कारणांनी चीन सरकारचे निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. यावेळेस मात्र एका विचित्रच गोष्टीमुळे जिनपिंग सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. विषय असा की, अलीकडे चीनमधील पुरुषांनी महिलांची अंतर्वस्त्रे घालून सोशल मीडियावर ऑनलाईन प्रमोशन मोहीम सुरु केली आहे. अनेक पुरुष केवळ शाब्दिकच नव्हे तर चक्क ब्रा- पॅंटी घालून व्हिडिओच्या माध्यमातून प्रमोशन करत आहेत. नेमकं असं झालं काय की पुरुषांना ब्रा-पॅंटीच्या जाहिराती करण्याची वेळ आली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर आता आपण पाहूया..

चीनच्या जिनपिंग सरकारने अलीकडेच काही कठोर नियम लागू केले आहेत. यानुसार महिलांना मोठ्या सोशल मीडिया लाईव्ह स्ट्रीमिंग ऍप्सवर अंडरवेअर घालून प्रमोशन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. म्हणूनच आता चीनच्या अंडरवेअर, Lingerie व्यवसायाच्या प्रमोशनसाठी पुरुषांना पुढाकार घ्यावा लागत आहे. मोठ्या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍप्सवर चक्क पुरुष ब्रा- पॅंटीची जाहिरात करत आहेत.

Paytm Payments Bank
Paytm पेमेंट्स बँकेला आणखी एक दणका! मनी लाँडरिंगप्रकरणी मोठा दंड, अर्थ मंत्रालयाची कारवाई
a drunk teacher entering a government school in Chhattisgarhs Bilaspur district carrying a liquor bottle in his pocket
धक्कादायक! मद्यपान करून शिक्षकाने सरकारी शाळेत लावली हजेरी, म्हणाला “मी रोज पितो..”; पाहा व्हायरल VIDEO
wagonr converted to pickup van see desi jugaa viral video
पठ्ठ्याच्या क्रिएटिव्हिटीला तोड नाही! जुगाडद्वारे बनविला वॅगनआर कारचा टेम्पो; VIDEO पाहून युजर्स अवाक्
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

लाईव्ह स्ट्रीमिंगवर पुरुष का ब्रा- पॅंटीचे करतायत प्रमोशन?

हे ही वाचा<< ५२८ किमी सलग धावणारी एकमेव भारतीय ट्रेन कोणती? महाराष्ट्रात ‘या’ स्थानकातुन जर ट्रेन चुकली तर थेट…

चीनमधील एका ट्विटर युजरने (@xiaojingcanxue) आपल्या पोस्टमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली होती. महिलांनी अंडरवेअरच्या जाहिराती केल्यात त्यांना ऑनलाईन अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली शिक्षा होऊ शकते असे सांगण्यात आले. म्हणूनच आता चीनच्या लॉन्जरी कंपन्यांनी महिलांऐवजी पुरुषांकडूनच महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या जाहिराती करून घेण्याचा मार्ग निवडला आहे.