तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, शूज, स्कुल बॅग किंवा मोबाईल खरेदी केल्या तर या वस्तूसोबत मिळणाऱ्या बॉक्समध्ये, एक पांढऱ्या रंगाची लहान पिशवी दिली जाते. ती पिशवी आपल्यापैकी प्रत्येकाने पाहिली असेल, मात्र त्या पिशवीमध्ये नेमकं काय असतं? याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आपण ती पिशवी फेकून देतो. पण तुम्ही फेकलेली पिशवी तुमच्या कामाची असून त्याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूच्या बॉक्समध्ये आढळणाऱ्या पांढऱ्या पिशवीमध्ये लहान साखरेसारखे जे खडे असतात त्यांना ‘सिलिका जेल’ असं म्हटलं जातं. शिवाय बॉक्समधील हे सिलिका जेल महत्त्वाच्या उद्देशाने ठेवण्यात आलेलं असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिलिका जेल का आहे महत्वाचं ?

हेही वाचा- रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, स्टेशन आल्यावर तुम्हाला जाग करण्यासाठी रेल्वेच करणार फोन; जाणून घ्या काय आहे सुविधा

कंपनीकडून प्रत्येक नवीन वस्तूच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येणाऱ्या या सिलिका जेलमध्ये हवेतील आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. याच क्षमतेमुळे नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि शूजच्या बॉक्समध्ये सिलिका जेलची पिशवी ठेवण्यात येते. शिवाय हे ठेवण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे पॅक असणारी वस्तू खराब होऊ नये.

कोणत्याही कंपनीमधील एखादी वस्तू बनवल्यानंतर ती ग्राहकांना विकण्यापर्यंत खूप काळासाठी एका बॉक्समध्ये बंद केली जाते. अनेक दिवसांपर्यंत ती बॉक्समध्ये बंद असल्यामुळे हवेतील आर्द्रतेमुळे ती खराब होण्याची शक्यता असते, त्यात बॅक्टेरिया येऊ शकतात आणि त्यामुळे त्यातून दुर्गंध येऊ शकतो ज्यामुळे बॉक्समधील वस्तू खराब होण्याची शक्यता असते.

हेही वाचा- Airplane Mode म्हणजे काय? फ्लाइट मोड चालू करणं कधी असतं गरजेचं? जाणून घ्या

ती खराब झाली तर कंपनीसह दुकानदाराचे नुकसान होऊ शकते. या सर्व समस्येवर उपाय म्हणून नवीन वस्तू पॅकींग करताना त्याच्या बॉक्समध्ये सिलिका जेल असणारी पांढरी पिशवी ठेवण्यात येते. शिवाय दुकानातील बॉक्समध्ये पॅक केलेले बूट अनेक दिवस बाहेर काढले जात नाहीत. अशा परिस्थितीत हवेतील आर्द्रतेमुळे ते खराब होऊ लागतात. मात्र, बॉक्समध्ये असलेले सिलिका जेल हवेतील ओलावा शोषून घेते. ज्यामुळे शूज खराब होण्याचा धोका टळतो.

पांढरी पिशवी टाकू नका –

हेही वाचा- Laptop खराब होण्याची चिंता विसरा; स्वच्छ करताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स

नवीन वस्तूंच्या बॉक्समध्ये मिळणारी ही सिलिका जेलची पिशवी आपण टाकून देतो. पण ती टाकू न देता तुमचे शूज आणि चप्पल ज्या ठिकाणी ठेवता. तिथे ती पिशवी तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जर त्याचा वापर केला तर तुमचे शूज, चप्पल बराच काळ वापरत नसतील तरी या जेलमुळे, वापरात नसलेले शूज लवकर खराब होणार नाहीत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why put a bag of silica gel in the box of new goods after reading this use you will keep this bag too jap
First published on: 10-12-2022 at 12:14 IST