Indian Railway Fact: भारतात रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरलेले आहे. जगात चौथ्या क्रमांकावर भारतीय रेल्वेचं जाळं आहे. देशात रेल्वेने प्रवास करणे सर्वात आरामदायकच नाही तर किफायतशीरही मानण्यात येते. लाखो प्रवाशी भारतात दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे हा भारतीयांच्या सर्वात जवळचा व आपुलकीचा विषय आहे. पण या रेल्वेविषयी अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या कदाचित आपल्यालाही माहिती नसतील. तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास केला असेलच पण दाराजवळील खिडकी वेगळी का असते? त्या खिडक्यांना बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड का असतात? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तर आज आम्ही रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागील खरं कारण सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही कधी ट्रेनने प्रवास केला असेल, नीट पाहिले तर तुमच्या लक्षात आले असेल की, ट्रेनच्या डब्यातील दरवाजा जवळची खिडकी ही इतर खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. जवळपास सर्वच गाड्यांमध्ये असे असते. तुम्ही कोणत्याही ट्रेनकडे कधी पाहिले तर त्यांच्या खिडक्यांचा हा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. पण यामागचे कारण जाणून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल.

रेल्वेमध्ये अनेक प्रकारच्या बोगी असतात. यामध्ये एअर कंडिशनर ते स्लीपर आणि सामान्य बोगी असतात. यामध्ये एसी बोगी वगळता इतर सर्व खिडक्या याच पॅटर्नमध्ये बनविलेल्या दिसतात. फक्त दरवाजाजवळील खिडकीला इतरांपेक्षा जास्त बार असतात. इतर खिडक्यांमध्ये हे बार फारच कमी असतात. यामुळे ट्रेनच्या आतुन काहीही बाहेर टाकणे शक्य होत नाही. ट्रेनच्या स्लीपर आणि सामान्य बोगीच्या खिडक्यांत लोखंडी सळी असते. पण दाराजवळ असलेल्या खिडकीत नेहमीपेक्षा जास्त लोखंडी सळ्या असतात.

(हे ही वाचा: भारतात फक्त ‘या’ ठिकाणी एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानकं; महाराष्ट्रातील जागेचे नाव वाचून व्हाल थक्क)

रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी वेगळी का असते?

तुम्ही विचारात पडला असाल की, फक्त दाराजवळील खिडकीला जास्त बार लोखंडी सळ्या लावण्याचे कारण काय असेल, वास्तविक, दाराजवळील खिडकीत चोरीची भीती सर्वाधिक असते. चोर अनेकदा या खिडक्यांमध्ये हात घालून सामान चोरून शकत होते. कारण, दाराच्या पायरीवरूनही या खिडक्यांपर्यंत सहज पोहोचता येते. प्रवासी झोपल्यावर दरवाज्याजवळील खिडकीतून चोरटे बहुतांश सामान चोरून नेतात. चोर अनेकदा या खिडक्यांना हात लावून वस्तू चोरत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

रात्रीच्या वेळी सर्व प्रवासी झोपलेले असताना या खिडक्यांमधून चोरट्यांनी सामान चोरले. या समस्येतून सुटका करण्यासाठी या खिडक्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त बार बसवण्यात आले. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी ट्रेन थांबलेली असताना चोरांना खिडकीतून दरवाजा उघडता येणार नाही, यासाठी दरवाजाच्या खिडक्यातही जास्त लोखंडी सळ्या बसविल्या आहेत.

रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी ट्रेनच्या खिडक्या सारख्याच असायच्या. मात्र, चोर दरवाज्याजवळ उभे राहतात आणि ट्रेन सुरू होताच खिडकीतून हात घालून महिलांचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू लुटून पळून जातात, अशा तक्रारी रेल्वेकडे येत होत्या. त्यानंतर सुरक्षेसाठी चोरांपासून लोकांच्या सामानाचे रक्षण करण्यासाठी दरवाजाजवळील खिडकीला जास्त बार लावण्यात आले असल्याचे समोर आले.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the windows near the entrance to a train coach vary from the rest of the windows pdb