Premium

स्त्रिया भांगामध्ये कुंकू का लावतात, जाणून घ्या कारण

हिंदू धर्मात भांगात कुंकू लावण्यामागे अनेक धार्मिक कारणे दिसून येतात. पण, तुम्हाला माहिती आहे का भांगामध्ये कुंकू लावण्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत

reason of applying vermilion
स्त्रिया भांगामध्ये कुंकू का लावतात? (Photo : yamigautam /Instagram)

Reason of applying vermilion : हिंदू धर्मानुसार विवाहित स्त्रिया भांगात कुंकू भरतात. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी भांगात कुंकू लावले जाते, अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. विवाहाच्या वेळी नवरदेवाने नवरीच्या भांगात कुंकू भरल्यानंतरच हिंदू विवाह संपन्न होतो. त्यामुळे हिंदू धर्मात भांगात कुंकू लावण्यामागे अनेक धार्मिक कारणे दिसून येतात. पण, तुम्हाला माहिती आहे का भांगामध्ये कुंकू लावण्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांगामध्ये कुंकू लावण्यामागचं कारण

ब्रम्हरन्ध्र आणि अध्मि नावाच्या मर्मस्थानाच्या बरोबर वर स्त्रिया कुंकू लावतात, ज्याला सामान्य भाषेत सिमान्त किंवा भांग म्हणतात. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय भांगात कुंकू भरल्यामुळे एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते, असे म्हणतात.

हेही वाचा : Ganesh festival Ganpati Gauri: कोण आहे ही ‘निर्ऋती’?; जी ठरली ‘ज्येष्ठागौरी’! 

सौंदर्यात भर

फक्त विवाहित स्त्रियांनी भांगात कुंकू भरावे, कुमारिकांनी भांगात कुंकू भरू नये, अशी अंद्धश्रद्धा आहे. पण, हल्ली सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक विवाहित आणि अविवाहित स्त्रिया आवडीने भांगात कुंकू भरतात. लाल रंगाचे कुंकू कोणत्याही कपड्यांवर उठून दिसते, त्यामुळे फॅशन म्हणूनही भांगात कुंकू भरले जाते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why women apply sindoor or vermilion on head in hindu rituals read scientific reason ndj

First published on: 27-09-2023 at 15:04 IST
Next Story
महिला आरक्षण प्रथम कुठे लागू झाले? महिलांच्या सहभागामुळे काय फरक पडला? जाणून घ्या सविस्तर!