पीएफ खातेदारांना EPFO ​​या संस्थेकडून कर्मचाऱ्यांना जेव्हा गरज भासेल तेव्हा पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी तुम्ही त्यातून पैसे काढू शकता. दर महिन्याला नियोक्ता (काम करत असलेली कंपनीकडून) आणि तुमच्या पगारातून तुमचा हिस्सा तुमच्या पीएफ खात्यात जमा होतो. सरकारने खातेदाराला आपत्कालीन परिस्थितीत या निधीतील काही भाग काढण्याची परवानगी दिली आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. पण नियमांनुसार, आपण केवळ आंशिक रक्कम म्हणजेच थोड्या प्रमाणात पैसे काढू शकता.

EPFO कडून ट्विट करून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणताही सदस्य ईपीएफओमधून त्याच्या/तिच्या मुलाच्या/मुलीच्या किंवा भाऊ/बहिणीच्या लग्नासाठी सहज पैसे काढू शकतो. पैसे काढण्याची रक्कम व्याजासह एकूण योगदानाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. मात्र, यासाठी काही अटी आणि शर्थी आहेत, त्या पैसे काढणाऱ्या सदस्यांनी पाळल्या पाहिजेत. तुमची EPFO ​​मध्ये किमान ७ वर्षांची सदस्यत्वता असली पाहिजे. तसेच याआधी तुम्ही लग्न आणि शिक्षणासाठी तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढलेले नसावेत.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

या टप्प्यांचे पालन करा

  1. सर्वप्रथम https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा.
  2. लॉगिनसाठी तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका.
  3. लॉगिन केल्यानंतर ऑनलाइन सेवेच्या पर्यायावर क्लिक करा.
  4. येथे तुम्हाला पर्याय निवडावा लागेल.
  5. यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल, जिथे तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक टाका आणि yesवर क्लिक करा.
  6. यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले जाईल.
  7. स्वाक्षरी केल्यानंतर ऑनलाइन दावा करण्यासाठी पुढे जा.
  8. ड्रॉप डाऊन मेनूमध्ये काही पर्याय दिसतील.
  9. आता तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे ती टाका आणि चेकची स्कॅन केलेली प्रतही जोडा.
  10. यानंतर तुमचा पत्ता भरा आणि आधार OTP वर क्लिक करा.
  11. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो सबमिट करा आणि क्लेमवर क्लिक करा.
  12. तुमच्या नियोक्त्याने विनंती मंजूर केल्यानंतर पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील.

शिक्षणासाठी पैसे काढण्याचे नियम काय?

EPF शैक्षणिक खर्चासाठी आंशिक किंवा अकाली पैसे काढण्याची परवानगी देतो. तुम्ही नोकरीच्या वेळी जमा केलेल्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम शिक्षणासाठी काढू शकता. यामध्येही नोकरीचे बंधन ७ वर्षे आहे.