World Oral Health Day 2023: दरवर्षी २० मार्च रोजी ‘जागतिक मौखिक आरोग्य दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधत दंत आरोग्याबाबत जनजागृती केली जाते. तोंड हे मानवी शरीरातील प्रमुख प्रवेशद्वार आहे. याच्या मार्फत अन्नपदार्थ शरीरामध्ये जात असतात. पचनक्रियेची सुरुवात देखील तोंडापासूनच होते. त्यामुळे दात, हिरड्या, जीभ असे अवयव योग्य निरोगी असणे आवश्यक असते. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र या संस्थेच्या अहवालानुसार, जगभरातील असंख्य लोक सध्या पोकळी (दात किडणे), पीरियडॉन्टल (हिरड्यांचे रोग) आणि तोंडाचा कर्करोग अशा काही मौखिक आजारांनी त्रस्त आहेत.

लोकांना तोड्यांच्या आजारांबाबत माहिती मिळावी, या आजारांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी २० मार्च २०१३ रोजी वर्ल्ड डेंटल फेडरेशनद्वारे ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन’ साजरा करायची प्रथा सुरु करण्यात आली. मौखिक आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. म्हणून आपले दात, जीभ, घसा एकूणच आपल्या तोंडाची निगा राखणे आवश्यक असते.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

या खास दिवसाच्या निमित्ताने आम्ही मानवी मौखिक आरोग्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

  • तोंडातील लाळेमुळे आपल्याला प्रत्येक पदार्थाची चव कळते.
  • मानवी तोंडामध्ये असलेल्या बॅक्टेरियांची संख्या पृथ्वीवरील एकूण माणसांच्या लोकसंख्येपेक्षा कैक पटीने जास्त आहे.
  • बाळ जन्माला येण्याआधी त्याच्या तोंडामध्ये दातांची निर्मिती होते. पण ते बाहेर येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जावा लागतो.
  • लहान बाळांना २०, तर वयस्कर माणसांना ३२ दात असतात.
  • मौखिक आरोग्यामध्ये बिघाड असल्यास त्याचा परिणाम शरीरावर होते. यामुळे मधुमेह, हृदयविकार असे काही आजार संभावण्याची शक्यता असते.
  • जीभ हा शरीरातील एकमेव अवयव आहे, ज्याला हालचाल करण्यासाठी स्नायू किंवा हाडांची मदत घ्यावी लागत नाही.
  • मानवी दातांचा एकतृतीयांश भाग हा हिरड्यांमध्ये लपलेला असतो.
  • आपल्या तोंडामध्ये १०,००० पेक्षा जास्त टेस्ट बड्स (Taste buds) असतात.