जुन्या बाइकची ऑनलाइन विक्री झोकात
मुंबई : खातरजमा केलेली, प्री-ओण्ड वाहने योग्य दराने नोंदवण्यासाठी व खरेदी करण्यासाठी भारतातील आघाडीची ऑनलाइन बाजारपेठ असलेल्या क्रेडआरने जुल २०१५ या महिन्यात अंदाजे १४०० वाहनांची विक्रमी विक्री केली. वर्षभराहूनही कमी काळात, क्रेडआरने विक्रीमध्ये आणि बाइकप्रेमींमधील लोकप्रियतेमध्ये आक्रमक वाढ नोंदवली आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू या केवळ तीन शहरांत सेवा देऊन, वेबसाइटमार्फत विक्री होण्याचे प्रमाण ३१% वरून ४५% पर्यंत वाढले आहे. अलीकडेच, क्रेडआरने युज्ड बाइकची खरेदी व विक्री करण्याची सुविधा दिल्लीतही उपलब्ध केली आहे. कंपनीने या आíथक वर्षांत सहाहून अधिक शहरांत सेवा विस्तारण्याचे ठरवले आहे. बाइकप्रेमींकडून मिळालेल्या सुरुवातीच्या भरघोस प्रतिसादामुळे, क्रेडआरने तरुणांसाठी ‘कॅप्टन कॅम्पस’ हा खास रेफरल कार्यक्रम आखला आहे. सहा आठवडय़ांच्या या पूर्वनियोजित उपक्रमाची सुरुवात भारताचे डेट्रॉइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथे झाली. एकाच वेळी, हा कार्यक्रम पुण्यातील विविध कॉलेजांमध्ये दाखल करण्यात आला. त्यामध्ये, संभाव्य विद्यार्थ्यांना क्रेडआरसोबत जोडण्यासाठी आणि विकण्यासाठी क्रेडआरवर नोंदवलेल्या बाइकचा प्रसार करण्यासाठी मदत करण्यासाठी, विद्यार्थ्यांना रेफ्री म्हणून स्वत:ची नोंदणी करण्यास सांगण्यात आले. क्रेडआरमार्फत, व्यवहार पूर्ण होण्याच्या वेळेस ग्राहक आणि रेफरर या दोघांनाही या कार्यक्रमाकडून इन्सेन्टिव्ह देण्यात आले. दोन आठवडय़ांच्या अल्प काळामध्ये,या उपक्रमामध्ये ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि त्यामुळे एकंदर विक्रीला चालना मिळाली. कॅप्टन कॅम्पस कार्यक्रमामार्फत, रेफ्रींना क्रेडआरमार्फत विकण्यात आलेल्या प्रत्येक बाइकवर १५०० रुपये मिळाले आणि विकलेल्या ५०व्या बाइकच्या रेफरन्ससाठी बँकॉक ट्रिपसह ७५,००० रुपयांपर्यंतचे रोख बक्षीसही मिळाले. क्रेडआरने क्रेडआरमार्फत विकलेल्या ३०व्या बाइकच्या रेफरन्ससाठी ३०,००० रुपयांची बाइकमोफत देण्यात आली.
होंडा जॅझचे सुयश
मुंबई : गेल्याच महिन्यात बाजारात आलेल्या होंडा जॅझने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. महिनाभरातच तब्बल नऊ हजार होंडा जॅझची विक्री झाली. होंडा कार्सच्या एकूण खपात जॅझचा हिस्सा आता १८ टक्क्यांवर पोहोचला आहे.  नव्या जॅझची विक्री सर्व स्तरांत झाल्याचे एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. आयडीटेक आणि आयव्हीटेक या दोन्ही अनुक्रमे डिझेल व पेट्रोल व्हर्जनमधील जॅझची निर्मिती झाली आहे. तसेच ऑटो व मॅन्युअल ट्रान्समिशन अशा दोन्ही प्रकारांत जॅझ उपलब्ध आहे.