बेशिस्त वाहतूक, खड्डेमय रस्ते आणि बेदरकारपणे वाहन चालवणे यासारख्या अनेक कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढते आहे. यातील वाहनचालकांच्या बेदरकारपणे वाहन चालविण्यावर प्रकाश टाकण्यासाठी ‘ऑटोकार इंडिया’ मासिकाद्वारे ‘‘द अनकूल मोमेन्टस् कॉन्टेस्ट’’ची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे असंयमितपणे वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सर्व देशवासियांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्याचे छायाचित्र काढून स्पर्धकाने हे छायाचित्र ‘ऑटोकार इंडिया’च्या फेसबूक पेजवर पोस्ट करायचे आहे. २ जूनपासून सुरू झालेल्या या स्पर्धेची सांगता २४ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत देशभारातील नागरिक भाग घेऊ शकतात. छायाचित्र पाठविण्याची शेवटची तारीख २१ जून आहे.
भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे २०१२ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार देशात होणाऱ्या अपघातांमध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘ऑटोकार इंडिया’ने ‘अनसेफ इज अनकूल’ या थीमसह रॅलीचेदेखील आयोजन केले आहे. फेसबुकसारख्या प्रसिद्ध सोशल मीडिया वेबसाईटच्या माध्यमाद्वारे आजच्या तरुण पिढीला सुरक्षित आणि जबाबदारीने वाहन चालविण्यास प्रोत्साहित करणे, हा या थीमचा उद्देश आहे.
सर्व स्पर्धकांमधून ‘ऑटोकार इंडिया’चे तज्ज्ञ वाहन चालक १० विजेत्यांची निवड करतील. तसेच जास्त शेअर आणि पसंती मिळवणाऱ्या छायाचित्रांची स्पर्धा जिंकण्याची शक्यता अधिक असून, विजेत्यांना जेबीएल हेडफोन्स आणि जीओ पक चार्जर्ससारख्या अन्य बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे जबाबदारीने वाहन चालविण्याचा संदेश पसरविण्याचा आमचा उद्देश असल्याचे ‘ऑटोकार इंडिया’चे संपादक हॉर्मज्द सोरब्जी म्हणाले. स्पर्धेची अधिक माहिती ‘ऑटोकार इंडिया’च्या
https://www.facebook.com/autocarindiamag/app_577711218993886 या फेसबुक पेज लिंकवर आणि टि्वटर हॅशटॅग #UNSAFEISUNCOOL वर उपलब्ध आहे.