News Flash

कोणती कार घेऊ?

* टाटांची इंडिका इमॅक्स (सीएनजी व्हर्जन) कशी आहे. या गाडीची खूप वैशिष्टय़े आहेत परंतु ती रस्त्यावर फारशी दिसत नाही. काय कारण आहे. दुसरे असे की,

| October 2, 2014 03:50 am

* टाटांची इंडिका इमॅक्स (सीएनजी व्हर्जन) कशी आहे. या गाडीची खूप वैशिष्टय़े आहेत परंतु ती रस्त्यावर फारशी दिसत नाही. काय कारण आहे. दुसरे असे की, हुंदाई आय१० इरा ही गाडी कशी आहे.
    – केदार हळणकर
*  टाटा इंडिका इमॅक्स ही एक चांगली हॅचबॅक आहे. मात्र, ती रस्त्यावर फारशी दिसत नाही, याचे कारण म्हणजे तिची म्हणावी तशी प्रसिद्धी झालेली नाही. एकूणच टाटा मोटर्सच्या गाडय़ांचे फारसे मार्केटिंग करताना दिसत नाही. त्यामुळे इमॅक्सबद्दल जास्त माहिती लोकांमध्ये नाही. तरीही ही गाडी चांगल्या मायलेजची आहे, हे नक्की. दुसरे म्हणजे आय १० इरा ही गाडी तुमच्या आवडीची आहे. तुम्ही नक्की विचार करा, कारण या गाडीचा ऑन रोड परफॉर्मन्स भन्नाट आहे.
* दीपावलीला कॉम्पॅक्ट एसयूव्ही घ्यायची आहे. मारुती अर्टगिा किंवा होंडाची मोबिलिओ हे दोन पर्याय आहेत. तुम्ही कोणती गाडी सुचवाल.
    – शैलेंद्र पाटील, जळगाव
*  होंडा मोबिलिओ अजून तरी प्रत्यक्षात रस्त्यावर फिरताना पाहिलेली नाही. त्या मानाने मारुती अर्टगिाने इनोवाला चांगलीच टक्कर दिली आहे. त्यामुळे अर्टगिोचा विचार करायला हरकत नाही. शिवाय मोबिलिओची फक्त जाहिरातबाजीच चालू आहे. बुकिंग सुरू आहे. त्यामुळे ती प्रत्यक्षात रस्त्यावर कधी धावेल माहीत नाही. त्यामुळे अर्टगिा इज बेस्ट चॉइस.
* अशोक लेलँडची स्टाइल ही गाडी कशी आहे.
– डॉ. शेखर इंगोरे
*  आतून स्पेशिअस असलेली गाडी एमपीव्ही या प्रकारात मोडते. ग्राऊंड क्लिअरन्स थोडा कमी वाटतो. निसानच्या इवालियाला टक्कर देण्यासाठी ही गाडी बाजारात आली आहे. मात्र, तिला उठाव तितकासा नाही. गाडी तुमच्या बजेटमध्ये बसत असली तरी आणखी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच विचार करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2014 3:50 am

Web Title: car buying recommendation
टॅग : Car
Next Stories
1 डिस्कव्हर १५० एफ : स्टायलिश जोश
2 मी बाइकवेडा.. : माझी लाडकी यझदी
3 कारनामा
Just Now!
X