’मारुती सेलेरिओ ऑटो गीअर कारला मॅन्युअल गीअरमध्ये बदलता येईल का.
– चंद्रशेखर शेलार
’होय, नक्कीच. त्यात डय़ुअल मोड आहे. फक्त क्लच नाहीय. बाकी मॅन्युअल गाडीसारखी ती वापरता येईल. आणि मॅन्युअली गीअर बदलता येतील.
’आमचे बजेट चार ते सव्वाचार लाख रुपये आहे. माझी उंची पाच फूट नऊ इंच आहे. आम्हाला नवीन कार घ्यायची असून आमच्याकडील रस्ते खराब आहेत. कोणती कार घेणे जास्त योग्य ठरेल. रेनॉ क्विड कशी आहे.

– सचिन मोरे
’इतक्या कमी बजेटमध्ये क्विड नक्कीच चांगली आहे. या गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्सही चांगला आहे. तसेच मायलेजही उत्तम आहे. तुमच्या उंचीचा काही मुद्दा नाही.
’मी २० ऑगस्ट रोजी मारुती सेलेरिओ झेडएक्सआय ही गाडी डीलरकडे बुक केली. त्यांनी मला दोन महिने वेटिंग पीरिअड असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही त्यांच्याकडून काही प्रतिसाद नाही. खरंच गाडीच्या डिलिव्हरीला एवढा वेळ लागतो का.
– डॉ. हितेश नेत्रावली
’सेलेरिओला एवढा वेटिंग पीरिअड नाहीच. तुम्ही मारुतीच्या ग्राहक सेवा केंद्रावरील टोल फ्री क्रमांकावर तुमची तक्रार नोंदवू शकता.
’माझा रोजचा प्रवास ४० ते ५० किमीचा आहे. माझे बजेट साडेसहा ते सात लाख रुपये आहे. पेट्रोल व्हेरिएन्टमध्ये मी कोणत्या गाडीला प्राधान्य देऊ. ह्य़ुंदाई एक्सेंट, टाटा झेस्ट आणि फोर्ड अस्पायर या गाडय़ांपैकी एखादी मला सुचवा. कोणती गाडी माझ्यासाठी उत्तम ठरेल.
– अतुल श्रेष्ठ
’तुमच्यासाठी स्विफ्ट डिझायर ही गाडी उत्तम ठरेल. कारण तुम्ही उल्लेखलेल्या तीनही गाडय़ांपेक्षा डिझायरचा मायलेज चांगला आहे. मात्र, तुम्हाला मायलेजविषयी काही अडचण नसेल तर फोर्ड अस्पायर ही पेट्रोल व्हेरिएन्टमधील गाडी तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
’मला होंडा सिटी पेट्रोल व्हेरिएन्ट आणि मारुती सुझुकी सिआझ या गाडय़ांपैकी नेमकी कोणती घ्यावी याबाबत प्रचंड द्विधा मन:स्थिती आहे. या दोन्ही गाडय़ांचे गुणदोष कृपया सांगा.
– रोहन गुरव
’तुम्ही पेट्रोल व्हर्जनमधील गाडीच्या शोधात असाल तर मी तुम्हाला होंडा सिटीच सुचवेन. या गाडीच्या इंजिनाचे आयुष्य मारुतीच्या गाडय़ांपेक्षा दीडपटीने जास्त आहे. या गाडीचा देखभाल खर्च कमी आहे तसेच आरामदायीपणातही ही गाडी इतरांच्या मानाने खूप चांगली आहे. सिआझची रिसेल व्हॅल्यू तितकीशी चांगली नाही.
’माझी उंची सहा फूट दोन इंच आहे. मला नवीन गाडी घ्यायची असून माझे बजेट चार लाखांपर्यंत आहे. मला इंधनस्नेही गाडी सुचवा तसेच माझ्या उंचीचा विचार करता लेग स्पेस चांगला असलेली गाडी सांगा.
-नितीन शिंदे
’मी तुम्हाला मारुती रिट्झ ही गाडी सुचवेन. ही गाडी आतून प्रशस्त आहे शिवाय तिची उंचीही चांगली आहे. या गाडीची किंमत पाच लाख ३५ हजार रुपये आहे. ही एक चांगली सिटी कारही आहे. तसेच देखभाल खर्च कमी असून अ‍ॅव्हरेजही चांगला देते.
’मला टॅक्सी व्यवसायासाठी चांगली गाडी घ्यायची आहे. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. आरामदायी, मायलेज जास्त आणि कमी देखभाल खर्च अशी कोणती गाडी आहे, हे कृपया सांगावे.
– किशोर मेस्त्री
’टॅक्सीसाठी तुम्हाला सीएनजी कार हवी असेल तर व्ॉगन आर हा एक चांगला पर्याय आहे. डिझेलवर चालणारी गाडी हवी असेल तर मारुती रिट्झ ही गाडी घ्यावी. सहा-सात आसनी गाडी हवी असेल तर अर्टगिा डिझेल ही गाडी उत्तम पर्याय आहे.
’फियाट डायनामिक ही सेकंडहँड गाडी किती किमतीत मिळेल. तिचा मायलेज किती असेल. तसेच तिचा देखभाल खर्च किती असेल, कृपया याविषयी मार्गदर्शन करा.
– शिवाजी कोकाटे
’फियाटच्या गाडय़ा चांगल्या आहेत. मात्र, सव्‍‌र्हिस आणि तिचे सुटे भाग यांबाबत थोडे अवघड आहे. पेट्रोल गाडय़ांना मायलेज खूपच कमी आहे. तुम्हाला ही गाडी दोन लाख २० हजारांपर्यंत मिळू शकेल.

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.