कार चालवताना ती एका बाजूला खेचल्यासारखी वाटते. कृपया उपाय सांगा. – राघव दोशी, जळगाव

चाक आणि जमिनीचा संपर्क हा एका विशिष्ट कोनात असणे अपेक्षित असते. तो नसेल किंवा दुसरे म्हणजे स्टीअिरग सिस्टीममध्ये दोष असेल तर वरील समस्या जाणवते. दोन्ही चाकांचे बॅलेिन्सग हे कार चालवताना खूप महत्त्वाचे असते. त्यावरच स्टॅबिलिटी अवलंबून असते. म्हणून व्हील बॅलेिन्सग महत्त्वाचे ठरते. कारची अलाइनमेंट योग्य प्रकारे केल्यास तिची व्हील सेटिंग बदलून ही समस्या नाहीशी होईल. याचा फायदा असाही होतो की टायरची झीज कमी होऊन त्याचे आयुष्य वाढते आणि व्हेहिकल स्टॅबिलिटी उत्तम राहते.

गीअर टाकताना तो जड वाटतो, हलकेच बदलता येत नाही. – दिलीप नाकटे, औरंगाबाद.
कार चालवताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्या. कार कमी वेगात असताना टॉप गीअर वापरू नये. तसे असेल तर शिफ्ट करून कमी करावा. तसेच पहिल्या गीअरवर जास्त एॅक्सिलेटर दाबून इंजिनला लोड देऊ नये. यामुळे गीअर बॉक्सला धोका निर्माण होऊ शकतो. गीअर टाकताना तो नीट, योग्य दिशेनेच टाकला जाईल याची काळजी घ्यावी. गीअर जड वाटत असेल तर दट्ट्यांमध्ये ल्युब्रिकेशन कमी झाले असेल. गीअर बॉक्समध्ये उष्णतेमुळे ऑइल जास्त व्हीस्कोसिटीचे वापरावे म्हणजे ते उच्च तापमानाला तग धरून घर्षण कमी होण्यास मदत होईल. क्लचची एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट नीट होते आहे की नाही हे पाहावे. नीट होत नसेल तर गीअर टाकताना जास्त शक्ती लावावी लागते. तसेच गीअरचे दाते तुटले किंवा झिजले असतील तरी गीअर बदलताना त्रास होत नाही.

या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.