कारच्या इंजिनात पाणी हेच कूलंट म्हणून का वापरतात?
शार्दूल गानू, देवरुख

कारमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त इंजिन सिलिंडर असतात. या सर्व इंजिनाला थंड करण्यासाठी पाणी हे कूलंट म्हणून वापरतात. कारण कूलंट म्हणून हवेचा वापर केला असता तर सर्व इंजिन सिलिंडरचे तापमान समान राहू शकले नसते. तसेच पाणी कुठेही उपलब्ध होऊ शकते. कमी क्षारयुक्त व स्वच्छ पाणी वाहताना फेस निर्माण करत नाही व उच्च तापमानाला पेट घेत नाही. तसेच पाणी हवेपेक्षा उत्तम प्रवाही असल्यामुळे ते सर्व जॅकेटमध्ये प्रवाहित होते आणि उष्णता वाहून नेते. जर ही उष्णता वाहून नेली गेली नाही तर इंजिनातील लुब्रिकेटिंग ऑइलचे ज्वलन होऊन प्रसरणामुळे त्यांची झीज होईल. हे सर्व धोके टाळण्यासाठी कूलंट म्हणून पाणी वापरले जाते.

माझे स्वत:चे गॅरेज आहे. एका कारच्या ऑइलमध्ये कूलंटची गळती होऊन ऑइल लवकर खराब होत आहे. कृपया उपाय सांगा.
राजेंद्र जावळे, सोलापूर
कूलंट गळत असेल तर इंजिनाला धोका पोहोचू शकतो आणि ते जर ऑइलमध्ये मिक्स होत असेल तर इंजिनातील इतर भागांवर त्यांचा परिणाम होऊन ते गंजू शकतील किंवा त्यांची झीज होऊ शकेल. कूलंट सिलिंगसाठी रबर रिंग दिलेल्या असतात. त्या फिट कराव्यात किंवा गरज भासल्यास बदलाव्यात, कारण सिलिंग रिंग खराब किंवा सैल असतील तर कूलंट गळती होऊ शकते. वेट लायनरच्या खाली सिलिंग रिंगची जागा असते.
मयुर भंडारीया सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.