dr02मला लहानपणापासूनच बाइकचं वेड होतं. वयोमानपरत्वे ते वाढत गेले. माझ्या काकांनी आरएक्स१०० घेतली त्यावेळी सगळ्यात जास्त ती मीच चालवली. त्यानंतर २००२ मध्ये मला माझ्या आईने आरई थंडरबर्ड ही बुलेट वाढदिवसानिमित्त भेट दिली. मग काय, मी तर भन्नाट फिरायलाच लागलो. मित्रांबरोबर लाँग राइडला जाणे हा तर नित्याचाच कार्यक्रम झाला. बायकोपेक्षा बाइकवर जास्त प्रेम आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती नाही ठरणार. माझ्या घरचेही मला खूप सपोर्ट करतात. सध्या सुपरबाइक्स चालवून बघतो. आमचा नोमॅड्स म्हणून एक ग्रुपही आहे, बाइकवेडय़ांचा. दूरदूपर्यंत येतो भटकून आम्ही बाइकवर. बाइक नसेल तर मन अस्वस्थ होते हे नक्की. पण दर रविवारी सकाळी एक फेरी असतेच बाइकवरून. मग मी गाणं गुणगुणतो मं और मेरी बाइक अक्सर ये बातें करते हैं..
अभिषेक चौधरी

प्रेम महत्त्वाचे, सीसी नाही
dr03मी जुन्नर या भागात राहतो. हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला असल्याने त्याचा आस्वाद घेण्यासाठी बाइक हवीच म्हणून मी महाविद्यालयात असतानाच गाडी घेतली आणि तिच्यावर मित्रांसोबत प्रचंड प्रमाणात फिरलो. मी सध्या शिक्षक असलो तरी माझे बाइकवेड आजही कायम आहे. माझे स्पष्ट मत आहे की बाइकवेडा असण्यासाठी तुमच्याकडे ५०० किंवा एक हजार सीसीचीच बाइक पाहिजे, अशी काही गरज नाही. आपली १०० सीसीची बाइकही अशा वेळेस समाधान देऊन जाते. बाइकवेडाला आकारावर मोजता येणार नाही तर बाइकवरील प्रेमाच्या साहाय्याने मोजावे लागेल.
– निखिल शेजवळ, जुन्नर

मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता :
vinay.upasani @expressindia.com