अमेरिकन कारनिर्मात्या फोर्ड मोटर्सने आता भारतीय रस्त्यांवर आरामदायी सेडान उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्ड इकोस्पोर्टला तसा काही प्रतिसाद न मिळाल्याने आता या सेडानवर फोर्डच्या आशा लागून राहिलेल्या आहेत. फोर्ड फिगो अस्पायर असे या सेडानचे नामकरण आहे. येत्या जुल महिन्यात ही सेडान लाँच होणार आहे. या गाडीची ही खास झलक..

फोर्डची सध्याची सर्वाधिक खपाची गाडी असलेल्या फिगो या गाडीच्याच नावावरून फिगो अस्पायर हे नामकरण करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी अस्पायर ही फिगोपेक्षा भिन्न असेल याची खात्री फोर्डने दिली आहे. फिगोचे अंतर्बाह्य बदललेले रूप म्हणजे अस्पायर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. फोर्डच्या गुजरात प्लांटमध्ये सध्या या गाडीची निर्मिती सुरू असून तिच्या विविध चाचण्या सध्या घेतल्या जात आहेत. फोर्डच्या या सेडानमुळे आगामी काळात या सेगमेंटमधील स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे.  

drive1बाह्यरूप
फिगो अस्पायरचे फ्रण्ट ग्रील आकर्षक आहे. बेंटले आठवतेय, अगदी तिच्या फ्रण्ट ग्रीलसारखंच हे आहे. तसेच अँग्युलर हेडलॅम्प्स हिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. चार मीटरपेक्षा किंचित कमी लांबीची ही सेडान असली तरी तिचा लुक खरोखर पाहताक्षणी प्रेमात पडावा असाच आहे. कॉम्पॅक्ट सेडानसारखी हिची लांबी तीन हजार ९९० मिमी आहे. सेडान म्हटली की मागच्या बाजूला प्रशस्त डिकी आणि रिअर लॅम्प्स, नंबर प्लेट असेच चित्र असते. मात्र, अस्पायरचा पाठीमागूनचा लुक तितकासा आकर्षक नसला तरी तिचे रिअर लॅम्प्स वेगळेच आहेत. इतर सेडानसारखे या गाडीची नंबर प्लेट बूटलिडवर नाही तर बम्परच्या थोडय़ा खाली आहे. त्यामुळे गाडीचा रिअर लुक थोडा अधिक वक्राकार वाटतो. बाकी वैशिष्टय़ांमध्ये पुढीलप्रमाणे समावेश आहे.
– ट्रेपझोडिअल ग्रील, जी की फोर्डच्या कायनेटिक डिझाइन थीमची खरीखुरी ओळख आहे.
– स्वेप्ट बॅक हेडलॅम्प्स
– आठ स्पोक अलॉय व्हील्स
– इंडिकेटर इंटिग्रेटेड ओआरव्हीएम कव्हर्स
– प्रशस्त दरवाजे आणि खिडक्या
– शार्कच्या कल्ल्यासारखा रेडिओ अँटेना
– टेललाइटची रचना बूमरँग आकारासारखी
– रिअर बम्परवर चंदेरी रंगाचे डिफ्युजर

अस्पायर का घ्यावी
ही एक साधारण सेडान प्रकारातील गाडी आहे. परंतु इतर कॉम्पॅक्ट सेडानसारखी नाही. तसेच चार मीटर लांबीच्या गाड्यांप्रमाणे हिचा आकार नाही. शिवाय पाच लोकांना आरामात प्रवास करता येऊ शकेल अशी हिची क्षमता आहे. खडबडीत रस्त्यांवरूनही चांगली चालू शकेल.

drive2अस्पायरचे फायदे
-हिच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे वाहतूककोंडीतही गाडी हाताळायला अगदी सोपी आहे
-प्रशस्त अंतरंग आणि आरामदायी आसनरचना
-बूट स्पेस इतरांपेक्षा खूपच प्रशस्त आहे
-विक्रीनंतरची सेवाही चांगली आहे
-किंमत परवडणारी आहे

तोटे
-बाह्यरूप आणखी थोडे सुधारता आले असते
-एन्ट्री लेव्हल व्हेरिएंटमध्ये अधिक सुरक्षित फीचर्स देता आले असते
-ग्राऊंड क्लीअरन्स थोडा कमी आहे

drive3अंतरंग
अस्पायरचे अंतरंग इकोस्पोर्टसारखेच दणकट, जडस आणि आकर्षक आहे. वातानुकूलन यंत्रणेच्या झडपा आणि म्युझिक कंट्रोल यंत्रणा यांचे बेमालूमपणे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
कॉम्पॅक्ट सेडान प्रकारातील गाडय़ांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या बूट स्पेसपेक्षा कितीतरी अधिक बूट स्पेस अस्पायरमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंक म्युझिक सिस्टीम, ऑटो फोिल्डग ओआरव्हीएम्स, कॅमेरासह रिव्हìसग सेन्सर्स, रेन सेिन्सग वायपर्स आणि ऑटो डििमग इंटर्नल मिरर ही काही अंतरंगची वैशिष्टय़े आहेत. मागच्या बाजूला बसणाऱ्यांसाठी वातानुकूलन यंत्रणेच्या झडपा आणि आर्मरेस्टला कप होल्डर्स या वैशिष्टय़ांचीही यात जोडणी केली जाणार आहे.

इंजिन आणि गीअरबॉक्स
फिगो सेडानला एक पेट्रोल आणि डिझेल इंजिन आहे. सध्याच्या फोर्ड फिगोमध्ये १.२ लिटरचे चार सििलडरयुक्त इंजिन असून त्यातून ६८ बीएचपी शक्ती व १०२ एनएम एवढी ऊर्जा निर्माण होते.
मात्र, नव्या फिगो अस्पायरमध्ये ७५ बीएचपी व १०२ एनएम एवढी ऊर्जा निर्माण करणारे इंजिन आहे. डिझेल स्वरूपात दीड लिटर चार सििलडरयुक्त इंजिन असून ते फिएस्टामधून घेण्यात आले आहे.
गीअरबॉक्समध्ये डिझेल प्रकारात फाइव्ह स्पीड मॅन्युअल तर पेट्रोल प्रकारात सिक्स स्पीड डय़ुएल क्लच गीअर अपेक्षित आहेत.
पेट्रोल गाडीचा मायलेज सुमारे २२.७ किमी प्रतिलिटर अपेक्षित असून डिझेल प्रकारांत हाच मायलेज सुमारे २५ किमी प्रतिलिटर एवढा असू शकेल.  

इतर वैशिष्ट्ये
-पॉवर फोिल्डग ओआरव्हीएम (साइड मिर्स)
-सात एअरबॅग्ज (टॉप एण्डसाठी), ऑटो एसी, एबीएस, ईबीडी
-किमान पाच लोक आरामात बसून प्रवास करू शकतील
-यांच्याशी स्पर्धा : स्विफ्ट डिझायर, होंडा अमेझ, ह्युंडाई एक्सेंट, टाटा झेस्ट

किंमत : साडेपाच लाख ते साडेसात लाख (एक्स शोरूम)

-समीर ओक
ls.driveit@gmail.com