नमस्कार. आतापर्यंत आपण कारनामा या सदरात कारसंदर्भात माहिती घेतली त्यामध्ये इंजिनची रचना, त्याचे कार्य, तसेच इतरही भाग जसे क्लच, ब्रेक, कूिलग सिस्टीम, ल्युब्रिकेशन सिस्टीम, स्टीअरिंग, ट्रान्समिशन यांची अंतर्गत रचना, कार्य हे सुद्धा विस्तारपूर्वक पहिले. कर चालवताना कोणती काळजी घ्यावी, तसेच कारच्या इतर भागांना धोका निर्माण होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास केला. ‘कारनामा’च्या उत्तरार्धात वाचकांकडून आलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तर यांना स्थान दिले. त्यामध्ये कारमध्ये झालेले प्रॉब्लेम्स आणि त्यावरील उपाय सादर केले.  आता या नवीन वर्षांत आपण बाइकबद्दलची माहिती घेऊया. बाइक्सचा इतिहास, त्यांची रचना, त्यांच्यातील इंजिनचे प्रकार, त्यांचे कार्य हे समजून घेऊ. तसेच इतरही भाग म्हणजे क्लच, गीअर बॉक्स, ब्रेक, सस्पेन्शन, व्हील्स यांची रचना आणि कार्य पाहू. या सदरच्या उत्तरार्धात वाचकांकडून प्रश्न मागवले जातील, ज्यांची उत्तर या माध्यमातून दिले जातील.