20आय लव्ह माय पल्सर

मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम करतो. माझ्या घरापासून कॉलेज फक्त १८ किमी अंतरावर आहे. त्यामुळे कॉलेजला जाण्यासाठी मी माझ्या पल्सरचाच उपयोग करतो. गेल्या सहा वर्षांपासून मी आणि माझी पल्सर आमची यारी आहे. नाशिक परिसरातील अनेक निसर्गरम्य ठिकाणे माझ्या पल्सरवरूनच मी पादाक्रांत केली आहेत. जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यात मी गाडीवरूनच फिरून आलो आहे. या प्रवासादरम्यान माझ्या गाडीने मला कधीही दगा दिला नाही. २०१०मधला एक प्रसंग सांगतो. माझी शेवटच्या वर्षांची परीक्षा होती. मी बाइकवरूनच परीक्षेला निघालो होतो. एका निसरडय़ा वळणावर मी बाइक जरा जोरात दामटली, त्यामुळे वाळूवरून गाडी घसरली आणि मी लांब फेकला गेलो. मात्र, डोक्यावर हेल्मेट असल्याने मला काही इजा झाली नाही. तसाच उठलो, परीक्षेला जाण्यासाठी वेळ होत होता म्हणून घाईघाईने निघालो. आश्चर्य म्हणजे माझ्या गाडीला एकही ओरखडा उठला नव्हता. मला तिने वेळेवर परीक्षेला पोहोचवले. तिची ही अशी साथ मला जीवनभर लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..आय लव्ह माय पल्सर..
मनोज दुकळे, नाशिक.