News Flash

मी बाइकवेडा.. फटफजिती

मी मूळचा मेहकरचा. इयत्ता सहावीत असताना वडिलांनी मला गाडी शिकवली. ही १९८८ची गोष्ट. मात्र, वयाने लहान असल्याने माझ्या हातात गाडी दिली जात नव्हती. १९८८ पासून

| March 27, 2014 12:09 pm

फटफजिती
मी मूळचा मेहकरचा. इयत्ता सहावीत असताना वडिलांनी मला गाडी शिकवली. ही १९८८ची गोष्ट. मात्र, वयाने लहान असल्याने माझ्या हातात गाडी दिली जात नव्हती. १९८८ पासून नंतरच्या २५ वर्षांत माझ्या घरी एकूण १८ मोटारसायकली वापरल्या गेल्या. मी १९९७ मध्ये शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाल्यावर अनुक्रमे स्प्लेंडर, एम८०, स्प्लेंडर प्लस, टीव्हीएस सुझुकी, टीव्हीएस सीटी ११० व हिरो स्प्लेंडर अशा सहा गाडय़ा वापरल्या. आजही माझ्याकडे तीन मोटारसायकली व अल्टो कार आहे. मात्र, माझे प्रेम बाइकवरतीच आहे. २००१च्या कालावधीत मी व माझे जिवलग मित्र दिलीप आखरे, दोघेही विवाहसमारंभासाठी जायला निघालो. मित्राचा विवाहसमारंभ गावापासून अवघ्या १५ किमी अंतरावर उमरा या गावी होता.  सुझुकी गाडी घेऊन अवघे १५ दिवसच झाले होते. त्यामुळे आरामात लवकर पोहोचू असा विश्वास होता. रस्ते खराब असल्याने अंदाज घेऊन लवकरच निघालो. उमराकडे जात  असतानाच मोळा या गावापासून वळण घेऊन पुढे गेलो. अवघ्या तीन किमी अंतरावर गाडी बंद पडली. सायंकाळचे सहा-सात वाजले होते. गाडीत पेट्रोल तपासले तर अर्धी टाकी पेट्रोल होते. गाडी बंद पडण्याचे कारण शोधले. प्लग उघडून तो साफ केला. तरीही गाडी सुरू होईना. गाडीची किकही जाम झाली होती. दिलीपने इंजिनाला हात लावून पाहिला तर त्याला जोरदार चटका लागला. शेवटी लग्नाला जाण्याचे रद्द करून गावाकडे परत निघालो. गाडी ढकलत ढकलत गावातील गॅरेजपर्यंत आणली. मेकॅनिकने गाडी तपासली. टीटी ऑइल संपल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्याच्याकडील ऑइल साइड इंजिनमध्ये टाकले. मात्र, तरीही गाडी सुरू होईना. तेवढय़ात माझे दुसरे मित्र संजय हिरगुडे समोरून येताना दिसले. त्याची गाडी बजाज बॉक्सर घेऊन घरी परतायचे असा निर्णय झाला. मात्र, त्यांचीही गाडी पंक्चर होती. पंक्चर काढताना रात्रीचे दहा वाजले. मग ते आम्हा दोघांना जाऊ देईना. शेवटी माझ्या शेलावजा रुमालाने सुझुकीचे हँडलबार बॉक्सरच्या सीटला मागे बांधले. मी सुझुकीवर तर दिलीप आणि संजय बॉक्सरवर असा आमचा प्रवास सुरू झाला. कधी तोल जाऊन, कधी गाडी घसरून आम्ही पडलो. एकदोनदा रुमालाची गाठही सुटली. अखेरीस वैतागून मी गाडीला जोरात किक मारली, तर काय आश्चर्य गाडी पटकन सुरू झाली! मेकॅनिकने टाकलेल्या टीटी ऑइलची कमाल होती. रात्री अकराच्या सुमारास घरी पोहोचलो. तेव्हापासून कानाला खडी लावून घेतलीय, टीटी ऑइल तपासल्याशिवाय गाडी काढतच नाही बाहेर.
– किरण डोंगरदिवे, मेहकर,
जि. बुलडाणा.

गाडी पंक्चर झाली नसती तर
आम्हाला बाइकवरून फिरण्याचा खूप नाद आहे. आम्हाला म्हणजे मी, इम्रान नवाज शाहबाज आणि इम्रानचे पुण्याचे दाजी आरिफ आम्ही तिघे. एके दिवशी आम्ही तिघांनीही विशाळगडावर बाइकने जाण्याचे ठरवले. सकाळीच तयारी करून आम्ही तिघे निघालो. प्रवास मजेत सुरू होता. कराड, कालेफाटा, ओंड ,उंडाळे , कोकरुड ,शेडगेवाडी ,मलकापूर,आंबा आणी विशाळगड असा प्रवास करण्याचे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणेच जातही होतो. तेवढय़ात आरिफ यांची गाडी पंक्चर झाली. मग काय पंक्चर काढण्यासाठी गॅरेजची शोधाशोध सुरू झाली. गाडी ढकलत ढकलत एका गावापाशी आलो. तिथे मेकॅनिक जागेवर नव्हता. त्याच्या आसपासच्या दुकानांतून मेकॅनिकचा मोबाइल नंबर मिळववला. फोनाफोनी करून त्याला बोलावून घेतले. तो एकदाचा आला. पंक्चर काढून होईपर्यंत दुपार झाली. पंक्चर काढून झाल्यानंतर आम्ही सुसाट निघालो, विशाळगडाच्या दिशेने. गडावर पोहोचल्यानंतर खूप प्रसन्न वाटले. सर्व गड फिरून झाल्यावर खाली उतरलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. घाईघाईत निघालो. जेवण करून परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी रात्रीचे आठ वाजले. कडाक्याची थंडी आणि जंगलातील प्राण्यांची धास्ती यामुळे अंग कुडकुडायला लागले. अखेरीस मनाचा हिय्या करून गाडीला किक मारली आणि रात्री ११ वाजता पुन्हा कराडला येऊन पोहोचलो. तब्बल १२ तास आम्ही ड्रायव्हिंग केले. गाडी पंक्चर झाली नसती तर कदाचित लवकर घरी पोहोचलो असतो असे वाटले. पण मजा आली.
– अमानुल्ला बागवान, कराड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 12:09 pm

Web Title: i am crazy for bikes 4
Next Stories
1 सेलेरिओ.. सुखद अनुभव
2 हर कलम कुछ कहता है..
3 गाडी बंद पडली.. नो टेन्शन
Just Now!
X