थार सीआरडीई
रांगडय़ा, रफ अ‍ॅण्ड टफ गाडय़ा तयार करणे ही मिहद्राची खासियत. स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही५००, झायलो या गाडय़ा याच पठडीतल्या. ऑफ रोड ड्रायिव्हिंगसाठीच त्या जास्त ओळखल्या जातात. मिहद्रा थार ही त्यात जरा वरच्या वर्गातली. खास जंगल सफारीसाठी तयार करण्यात आलेली ही थार अ‍ॅडव्हेंचर्ससाठी तर पर्वणीच ठरली. हीच थार आता नव्या रूपात सादर झाली आहे. अगदी ऑफिसलाही घेऊन जाता येईल, अशा पद्धतीची..

जंगल सफारी किंवा नेचर ट्रेल असे शब्द कानावर पडले की  ओपन जीप, त्यावर स्वार झालेला आणि शिकार करण्यासाठी टपलेला शिकारी (डोक्यावर हॅट आणि खांद्याला बंदूक अशा वेशातला) असे दृश्य हमखास डोळ्यासमोर तरळते. मग त्याची ती जीप जंगलातल्या अवघड वाटा, चढ-उतार, पाण्याने भरलेले खड्डे, खाचखळगे लीलया पार करून एखाद्या उंच ठिकाणी जाते आणि मग तेथून तो सर्व साजोसामान उतरवून एखाद्या मोक्याच्या ठिकाणी सावज टिपण्याच्या मिषाने बंदुकीचा निशाणा लावणार हे दृश्य ओघाने येते. या सर्व गर्दीत लक्षात राहते ती शिकारीची जीप अथवा त्याने वापरलेले वाहन म्हणू या हवं तर. हे वाहनच शिकारीचे निम्मे काम करत असते. या अशा वाहनांची क्रेझ समस्त वाहनप्रेमींमध्ये असते. परंतु फक्त जंगल सफारीसाठी म्हणून गाडी घेणे मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे नाही, असे सुस्कारे सोडत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु आता हे चित्र बदललंय मिहद्रा थारने. नव्या रूपातली थार तुम्हाला अगदी ऑफिसातही नेता येऊ शकते, अशी तिची रचना करण्यात आली आहे. पाच दिवस ऑफिस आणि सप्ताहअखेर जंगलात, असे प्लॅिनग करणाऱ्यांसाठी ही आनंदवार्ताच आहे.
मिहद्राने जुन्या थारमध्ये थोडे बदल करून तिला नव्या रूपात सादर केले आहे. गाडीचे बाह्य़  रूप तसेच रांगडे आहे. फक्त तिची अंतर्गत रचना थोडी बदलण्यात आली आहे. म्हणजे आकर्षक डॅशबोर्ड, आरामदायी आसने, वातानुकूलन व्यवस्था अशा कॉर्पोरेट जगताला सोयीस्कर ठरतील अशा सुविधा नव्या थारमध्ये देण्यात आल्या आहेत.
मिहद्राच्या इगतपुरी प्लान्टमध्ये तयार करण्यात आलेल्या या नव्या थारच्या ऑफ रोड ड्रायिव्हगचा थरार नुकताच अनुभवता आला. मिहद्रातर्फेच तयार करण्यात आलेल्या ऑफ रोड ट्रॅकवर थार चालवायला मिळाली. कमरेच्या उंचीचे खड्डे, त्यात पाणी, चिखल, निसरडय़ा नागमोडी वाटा, असा हा ट्रॅक आहे. अगदी फूटबोर्डपर्यंत पाणी येईल एवढय़ा मोठय़ा खड्डय़ातून किंवा छोटा नाला म्हणू हवं तर, थार अगदी सहज पार झाली. इंजिनमध्ये पाणी जाऊन गाडी बंद पडणे नाही की कोणती कुरकुर नाही. शिवाय फोर व्हील ड्राइव्ह असल्याने चढण किंवा उतार अथवा गुडघाभर चिखलातूनही थार लीलया पार झाली. गाडीचं स्टीअिरग हातात घेतले की फक्त  ते हॅण्डल करणे आणि योग्य तिथे वळवणे एवढेच करायचे. कारण ऑफ रोड चालवताना गाडीचे बॅलेिन्सगच महत्त्वाचे. फार फार तर दुसऱ्या-तिसऱ्या गीअरवर थार आरामात चालते. पुढे दोघे आणि मागे चौघे, असे सहा जण थारमधून जंगल सफारीचा आस्वाद घेऊ शकतात.

थारची वैशिष्टय़े
* नवीन बम्पर आणि व्हील कमान
* नवीन सुस्पष्ट लेन्स हेडलाइट्स
* फूटबोर्ड
* आकर्षक छत
* छत काढण्याची सुविधाही उपलब्ध
* वातानुकूलन यंत्रणा
* आरामदायी आसन व्यवस्था
* १२ व्होल्टेजचे चाìजग पॉइंट्स
* संपूर्ण नवे इंटेरिअर

तांत्रिक वैशिष्टय़े
* इंजिन क्षमता २४९८ सीसी
* इंधन प्रकार डिझेल
* मायलेज १३ किमी प्रतिलिटर
* इंधन टाकी क्षमता ६० लिटर
* लांबी ३९२० मिमी
* रुंदी १७२६ मिमी
* उंची १९३० मिमी
* पॉवर स्टीअरिंग
* फोर व्हील ड्राइव्ह

या सुविधांचा अभाव
* पॉवर विंडोज नाहीत
* सेंट्रल लॉकिंग नाहीत
* अ‍ॅण्टी ब्रेकिंग सिस्टीम
* एअरबॅग्ज
* अलॉय व्हील्स

किंमत
* आठ लाख तीन हजार रुपये (एक्स शोरूम)
नीलेश पानमंद -nilesh.panmand@expressindia.com