News Flash

नॅनो झाली मोठ्ठी..!

सर्वसामान्यांना परवडणारी लाखभर रुपयातील कार अशी ही रतन टाटांची ‘ड्रीम स्मॉल कार’ खूप मोठ्ठी झाली आहे. तिच्या जन्मापासूनच देश-परदेशात तिच्याविषयी उत्सुकता होती. सर्वात किफायतशीर किंमतीची

| February 14, 2013 01:33 am

सर्वसामान्यांना परवडणारी लाखभर रुपयातील कार अशी ही रतन टाटांची ‘ड्रीम स्मॉल कार’ खूप मोठ्ठी झाली आहे. तिच्या जन्मापासूनच देश-परदेशात तिच्याविषयी उत्सुकता होती. सर्वात किफायतशीर किंमतीची चौकोनी कुटुंबासाठी बनवलेली नॅनो अल्पावधीतच लोकप्रिय तर झालीच शिवाय विश्वासार्हही बनली आहे..

टाटा म्हणजे विश्वासाची परंपरा.. टाटा समूहाचं कोणतंही उत्पादन घ्या, या परंपरेचे तंतोतंत पालन झालेले दिसतेच दिसते. म्हणूनच तर ‘भारत म्हणजे टाटा’ असं ब्रॅिण्डग जागतिक स्तरावर हमखास दिसून येतं. असो, तर याच समूहाचे माजी अध्वर्यू रतन टाटा यांचे स्वप्न असलेल्या नॅनोने ही परंपरा कायम राखली आहे. भारतातील सर्वात विश्वासू गाडी असा सन्मान नॅनोने यंदा मिळवला आहे.
‘ब्रॅण्ड ट्रस्ट रिपोर्ट, इंडिया स्टडी, २०१३’ यांच्यातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नॅनोला हा सन्मान मिळाला आहे. देशभरातील २११ श्रेणींतील विविध अशा ११०० विश्वासू ब्रॅण्डचे सर्वेक्षण यादरम्यान करण्यात आले. देशातील १६ शहरांमधून अडीच हजार लोकांकडून त्यांची सर्वात विश्वासू गाडी कोणती याची पाहणी करण्यात आली. त्यात चारचाकी वाहनांमध्ये नॅनो ही सर्वात विश्वासाची गाडी असल्याचे अधोरेखित झाले.
सर्वसामान्यांना परवडणारी लाखभर रुपयातील कार अशी ही रतन टाटांची ‘ड्रीम स्मॉल कार’ खूप मोठ्ठी झाली आहे. तिच्या जन्मापासूनच देश-परदेशातील लोकांमध्ये उत्सुकता होती. सर्वात किफायतशीर किंमतीची चौकोनी कुटुंबासाठी बनवलेली नॅनो अल्पावधीतच देश-परदेशात ग्राहकांची लाडकी बनली नसती तरच नवल होतं. आजच्या घडीला नॅनोचे चाहते सोशल नेटवìकग साइट्सवरही आहेत. फेसबुकवर तर ३० लाख लोकांनी नॅनोचे चाहते असल्याची नोंद केली आहे, आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील वर्षी ‘टॉप टेन टेन बेस्ट सेिलग कार्स’च्या यादीतही नॅनोने पहिल्या तीनात क्रमांक पटकावला होता. टाटा मोटर्सतर्फे नॅनोच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधाही या लोकप्रियतेत हातभार लावतात, जसे की, चार वर्षांची किंवा ६० हजार किलोमीटपर्यंतची वॉरण्टी. अलीकडेच नॅनोची ‘विशेष एडिशन’ लाँच झाली. त्यात तिच्या आधीच्या बाह्यरुपात थोडासा बदल करण्यात आला असून अंतर्गत रचनाही विशेषकरून बदलवण्यात आली आहे. अलॉय व्हील्स, ग्लोव्ह बॉक्सेस, म्युझिक सिस्टीम आणि डिझायनर डिकल्स ही त्यातली काही खास वैशिष्ट्ये आहेत. नॅनोची ही विश्वासाची सफर लाखो किलोमीटपर्यंत अव्याहत सुरूच राहो ही सदिच्छा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 1:33 am

Web Title: nano become bigger
Next Stories
1 टाटा इण्डिगो लिम्का बुकात
2 चार्जिग स्टेशन्सचा सुजाण वापर
3 तंत्र.. इलेक्ट्रिक कारचे
Just Now!
X