१. इलेक्ट्रिक स्पार्क प्लगमधून स्पार्क होत नाही – हरीकेश कुलकर्णी, शेवगाव

’ शक्यतो पावसाळ्यात हा प्रॉब्लेम होऊ शकतो. स्पार्क प्लगच्या कॅपमध्ये पाणी गेले असेल तर स्पार्क होणे थांबते. अशा वेळी स्पार्क प्लग कॅप स्वच्छ करावी आणि ती घट्ट बसवावी. दुसरे कारण असे की, स्पार्क प्लगवर कार्बन साठणे. असे असल्यास पेट्रोल वापरून आतील कार्बन स्वछ करा. यापुढे स्पार्क होत नसल्यास इग्निशन कॉइलमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा टेन्शन वायर लूज असू शकतात.
२. कारमधून काळा धूर जास्त प्रमाणात येतो. जेव्हा इंजिन नॉर्मल किंवा आयडिलग कंडिशनला चालू असते. – नीरज तांबारे, नागपूर<br />’ याचे मुख्य कारण असू शकते की, इंजिनला हवेचा पुरवठा करणारे एअर फिल्टर खराब असणे किंवा इंजिन ओव्हरलोड होणे. या कारणांव्यतिरिक्त कार्बन साठल्यानेसुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. सायलेन्सरच्या सुरुवातीला असलेल्या एग्झॉस्ट पाइपमध्ये कार्बन साठल्याने इंजिन काळा धूर फेकते. अशा वेळी इंजिन लोड जास्त प्रमाणात घेईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. एअर फिल्टर वेळच्या वेळी चेक करावा आणि पाइपमध्ये साठलेली काजळी (कार्बन) स्वछ करावा.
या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.comवर पाठवा.