मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम आहेत .
११) रस्त्यावरून जाण्याचा प्रथम अधिकार : एखाद्या नियंत्रणविरहित रस्त्याच्या क्रॉसिंगवर पायी चालणाऱ्या व्यक्तीचा प्रथम अधिकार असतो. जेव्हा एखाद्या रस्त्यावर फुटपाथ किंवा ट्रॅक्स् सायकल जर बनवलेले असतील तर अशा रस्त्यावरून चालकाने आपले वाहन चालवू नये.
१२) यूटर्न घेण्य़ाबाबत : जेथे यूटर्न घेणे प्रतिबंधित केले असेल तेथे चालकाने यूटर्न घेऊ नये, जास्त वर्दळीच्या रस्त्यावर यूटर्न घेऊ नये. जेथे यूटर्न प्रतिबंध केलेला नसेल तेथे चालकाने उजवीकडे वळण्याचा संकेत हाताने द्यावा, रिअर व्ह्यू मिरर, मध्ये बघून जेव्हा सुरक्षित असेल तेव्हा यू टर्न घ्यावा.
१३) चालकाने द्यायचे संकेत : सर्व वाहनांच्या चालकांनी वाहन चालवताना खालीलप्रमाणे संकेत द्यावे:
अ) जेव्हा वाहनाचा वेग कमी करायचा असेल तेव्हा चालकाने त्याचा उजवा हात लांब करावा आणि वाहनाच्या उजव्या बाजूला घ्यावा, तळहात खालच्या बाजूला घ्यावा  आणि उजवा हात बऱ्याच वेळा अशा प्रकारे खाली-वर करावा जेणेकरून रस्त्यावरील इतर वाहनचालकांना विशेष करून पाठीमागच्या वाहनचालकांना लक्षात येईल.
संजय डोळे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका
supreme court
तथ्यशोधन कक्षाबाबतच्या अधिसूचनेला स्थगिती
supreme court
पुरवणी आरोपपत्रांवरून ईडीची खरडपट्टी; जामीन मिळण्याच्या अधिकाराचे हनन- सर्वोच्च न्यायालय