प्रश्न : जर आपल्याकडे फोर व्हील किंवा थ्री व्हील लायसेन्स असेल तर त्या लायसेन्सवर टू व्हील मोटार सायकल चालवता येते काय?
उत्तर : नाही , मोटार सायकल हा वेगळा वर्ग आहे. मोटार सायकलसाठी वेगळी परीक्षा देऊन लायसेन्सवर त्या वर्गाची नोंद करावी.
प्रश्न : कारचे लायसेन्स टुरिस्ट कार चालवण्यासाठी कायदेशीर आहे काय?
उत्तर : नाही, कारचे लायसेन्स खाजगी नंबर असलेल्या वाहनासाठी चालते. या लायसेन्सची पहिली विधिग्राह्यता वयाच्या पन्नास वष्रे पूर्ण होईपर्यंत असते. त्यानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागते; तर टुरिस्ट कारसाठी ट्रान्सपोर्ट लायसेन्स काढावे लागते. ट्रान्सपोर्ट लायसेन्ससाठी एक वर्ष जुने खाजगी वाहन चालवण्याचे लायसेन्स असावे, तसेच वयाची २० वष्रे पूर्ण झालेली असावी. त्यानंतर लìनग लायसेन्स काढावे. ट्रान्सपोर्ट लायसेन्ससाठी ड्रायिव्हग स्कूलमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नमुना क्रमांक ५ मध्ये जोडणे अनिवार्य आहे, तसेच मेडिकल प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य असते. ट्रान्सपोर्ट लायसेन्सची मुदत तीन वष्रे असते. टुरिस्ट कार चालवण्यासाठी लायसेन्स तसेच बिल्ला (ुंॠिी) देखील अनिवार्य आहे .
प्रश्न : लìनग लायसेन्स किंवा पर्मनंट लायसेन्स काढण्यासाठी सध्या काय पद्धत आहे.
उत्तर : यापूर्वी लìनग लायसेन्स किंवा पर्मनंट लायसेन्स काढायचे असल्यास आरटीओ कार्यालयात जाऊन लायसेन्स किंवा लìनग लायसेन्सचे काम केले जात असे. आता आपणास वरील दोन्ही कामासाठी http://www.sarathi.nic.in या वेब साईटवर प्रथम मुलाखतीचा दिनांक आणि वेळ ठरवावा लागतो आणि त्या ठरलेल्या दिवशी आणि वेळेवर त्या आरटीओ कार्यालयात हजर राहावे लागते.
प्रश्न : एकाच लायसेन्सवर कार (एन टी) आणि कार (ट्रान्सपोर्ट) हे वर्ग नोंदवून घ्यावे काय?
उत्तर : आपण जेव्हा ट्रान्सपोर्ट लायसेन्स काढतो तेव्हा आपल्याकडे एनटी लायसेन्स असणे अनिवार्य असते. जेव्हा आपण आरटीओ कार्यालयातून  ट्रान्सपोर्ट लायसेन्स काढतो तेव्हा त्यावर एनटीची नोंद नसेल तर तसे निदर्शनास आणून द्यावे. कारण एनटीची प्रथम मुदत वयाची ५० वष्रे पूर्ण होईपर्यंत असते. अन्यथा तुमची ट्रान्सपोर्टची मुदत संपली म्हणून काही विमा कंपन्या क्लेम नाकारतात आणि नियमांच्या माहितीअभावी क्लेम मिळत नाही.
प्रश्न : लायसेन्स काढले नसताना वाहन चालवताना आढळले तर काय होऊ शकते?
उत्तर :  लायसेन्स काढले नसताना वाहन चालवणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे. यासाठी वाहन मालकास तसेच चालकास न्यायालयात दंड किंवा आरटीओ कार्यालयात तडजोड शुल्क भरणा करावा लागतो. तसेच आपल्या ताब्यातील वाहन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये अडकवून ठेवण्यात येते.