News Flash

स्टायलिश, तरीही..

गाडीच्या चाकात काही अडकू नये यासाठी त्यावर गार्डही देण्यात आले आहे.

| September 4, 2015 07:13 am

हिरोपासून विभक्त झाल्यानंतर झपाटय़ाने विस्तारलेल्या होंडाने सातत्याने ग्राहकांना विविध सेगमेंटमधल्या बाइक उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या ड्रीम युगाला चांगला प्रतिसाद लाभला. आताही होंडाने ११० सीसीची छोटी परंतु स्टायलिश लिवो बाजारात आणून ग्राहकांना एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. स्टायलिश असली तरीही सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या या होंडा लिवोची तोंडओळख..
दुचाकी क्षेत्रात सध्या मंदीसदृश वातावरण असले तरी नवनव्या दुचाकी रस्त्यावर येण्याचा सिलसिला काही थांबलेला नाही. जुलमध्ये होंडाने लिवो या ११० सीसी क्षमतेच्या बाइकचे सादरीकरण केले. एवढीच क्षमता असलेल्या ट्विस्टरला मात्र तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता, म्हणून लिवोला सादर करण्यात आले आहे. आगामी काळात येणारा सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊनच लिवो बाजारात आली आहे.
लिवो दिसायला तर स्टायलिश आहे. मात्र तिचा वापर स्पोर्ट्स बाइक म्हणून नक्कीच होणार नाही, याची पूरेपूर काळजी होंडाने घेतली आहे. याचाच अर्थ होंडाने केवळ तरुणाईला आकर्षति करायचे म्हणून लिवोची निर्मिती केलेली नाही. हिच्याकडे पाहताक्षणीच त्याचा बोध होतो. अँग्युलर आणि सुरचित हेडलॅम्प्स आणि त्याच्या दोन्ही बाजूला वक्राकार रचना हा हिचा तोंडवळा. त्यामागे असलेली इंधनाची टाकी व तिला पुढील बाजूला जोडण्यात आलेले फ्लँक्स यामुळे गाडीचा चेहरामोहरा रांगडा वाटत असला तरी गाडी सुरू केल्यानंतर मात्र तिच्यातला नाजूकपणा जाणवतो. लिवोला देण्यात आलेले चारही गीअर वरच्या बाजूचे आहेत. म्हणजे सीबी ट्विस्टरसारखे एक खाली आणि तीन वर असे नाहीत. लिवोचे फायिरगही कानाला सुखकारक वाटते. गाडी तुम्ही स्टार्ट बटन दाबून सुरू केली किंवा किक मारून सुरू केली की काही वेळातच इंजिन मोशनला येऊन गाडीचे फायिरग सुरू होते. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला असाल आणि गाडी तशीच सुरू असेल तर फायिरगचा आवाजही येणार नाही एवढा मुलायमपणा आहे फायिरगच्या आवाजात.सीटची रचनाही आरामदायी आहे. मागच्या बाजूला बसणाऱ्याच्या पाठीला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊनच सीटची रचना करण्यात आली आहे. चालकाच्या सीटपेक्षा किंचित बाक देऊन मागील सीट उंच करण्यात आली आहे. परंतु त्यामुळे मागच्याला बसायला आरामदायी वाटेल असे दिसते. तसेच गाडीच्या चाकात काही अडकू नये यासाठी त्यावर गार्डही देण्यात आले आहे.लिवोच्या हँडलच्या मधल्या बाजूला प्रत्येक गाडीला असते त्याप्रमाणे स्पीडोमीटर आणि इंधन प्रमाण केवळ यांचीच माहिती देणारे अ‍ॅनलॉग देण्यात आले आहेत. शिवाय िब्लकर्सही आहेतच. म्हणजे फारसा फापट पसारा न देता (उदा- डिजिटल घडय़ाळ, डिजिटल स्पीडोमीटर वगरे) बाइकस्वाराचे लक्ष विचलित होणार नाही, याची दक्षता बाळगण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण लिवोची थीम ही काळ्या रंगाची आहे. इंजिनाला काळा रंग देण्यात आला आहे. इंधन एक्झॉस्ट पाइपलाही याच रंगाचा वापर करण्यात आला आहे, तर अलॉय व्हील्सनाही या रंगाची शेड देण्यात आली आहे.
तांत्रिक तपशील

लांबी – २०२० मिमी

रुंदी – ७४६ मिमी

उंची – १०९९ मिमी

व्हील बेस – १२८५ मिमी

ग्राऊंड क्लिअरन्स – १८० मिमी

इंधन टाकी क्षमता – साडेआठ लिटर

इंजिन क्षमता – ११० सीसी

एअर कूल्ड व फोर स्ट्रोक

कमाल वेग – ८६ किमी प्रतितास

स्टाìटग मेथड – सेल्फस्टार्ट किंवा किक

ब्रेक टाइप – फ्रण्ट ब्रेक डिस्क आणि ड्रम, रीअर ब्रेक ड्रम

किंमत

५७ हजार रुपये

(एक्स शोरूम)

या रंगांमध्ये उपलब्ध

ब्लू मेटॅलिक,

ब्लॅक,

पर्ल अमेिझग व्हाइट

सनसेट ब्राऊन मेटॅलिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 6:44 am

Web Title: stylish bike
Next Stories
1 मर्सिडीजच्या ‘डिझायनो’
2 कोणती कार घेऊ?
3 कलाकार : ऑटोमॅटिक कारची मजा न्यारी
Just Now!
X