News Flash

टाटा इण्डिगो लिम्का बुकात

टाटा इण्डिगोच्या इसीएस या गाडीची आता थेट लिम्का बुकात नोंद झाली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि पश्चिमेकडील कोटेश्वर ते ईशान्येतील किबितु ही दोन टोकं या

| February 14, 2013 01:31 am

टाटा इण्डिगोच्या इसीएस या गाडीची आता थेट लिम्का बुकात नोंद झाली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि पश्चिमेकडील कोटेश्वर ते ईशान्येतील किबितु ही दोन टोकं या गाडीने अवघ्या १५ दिवसांत जोडली. या महिन्याच्या सुरुवातीला ‘इण्डिगो एन्ड्युरन्स’ प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. टाटा मोटर्स आणि ऑटोकार इंडिया यांच्यातर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. देशाच्या चारही कोपऱ्यांना जोडण्यासाठी ही अखंडित रॅली होती. त्यात इण्डिगो ईसीएसने बाजी मारली.

या स्पध्रेतील इण्डिगोची कामगिरी अशी
*    इंधन वापर आणि मायलेज :  ४१.१४ किमी प्रतिलिटर
*    सरासरी इंधनाचा वापर :  १८.७ किमी प्रतिलिटर
*    प्रवासासाठी लागलेला वेळ :  ३४२ तास
*    कारमध्ये ड्राइव्ह करताना लागलेला सर्वात जास्त कालावधी :  ९६ तास
*    एकाचवेळी अधिकाधिक कापलेले अंतर :  ९९८ किमी
*    २४ तासांत कापलेले सरासरी अंतर :  ९३३.८ किमी
*    आत्यंतिक कमी तापमानात केलेले ड्रायिव्हग :  
-४ अंश सेल्सिअस
*    अत्युच्च तामानात केलेले ड्रायिव्हग :  ४८ अंश सेल्सिअस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 1:31 am

Web Title: tata indigo in limca book of records
टॅग : Car
Next Stories
1 चार्जिग स्टेशन्सचा सुजाण वापर
2 तंत्र.. इलेक्ट्रिक कारचे
3 देश की धडकन..
Just Now!
X