News Flash

सेडान भरारी

भारतीय ऑटोमोबाइल मार्केट हे हॅचबॅक गाडय़ांसाठी भरभराटीचं असलं, तरी गेल्या काही वर्षांत सेडान गाडय़ांचा खपही लक्षणीय आहे. आपल्या घरासमोर लांबलचक आणि चकचकीत गाडी असावी, हे

| January 9, 2014 09:09 am

भारतीय ऑटोमोबाइल मार्केट हे हॅचबॅक गाडय़ांसाठी भरभराटीचं असलं, तरी गेल्या काही वर्षांत सेडान गाडय़ांचा खपही लक्षणीय आहे. आपल्या घरासमोर लांबलचक आणि चकचकीत गाडी असावी, हे कोणत्याही भारतीयाचं स्वप्न असतं. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी बँकांनीही गाडय़ांसाठीची कर्जे सुलभ केली आहेत. त्यामुळे उच्च मध्यमवर्गीय घरांतही आता सेडान गाडय़ा सहजपणे दिसतात. सेडान प्रकारातल्या अनेक नवनवीन गाडय़ा या वर्षांत भारतीय बाजारपेठेत येणार आहेत. याचा आढावा घेत आहेत रोहन टिल्लू.
मर्सिडीज बेन्झ  न्यू एस क्लास
गेल्या दहा वर्षांमधील भारतीय रस्त्यांचं निरीक्षण केलं, तर सध्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी अशा महागडय़ा गाडय़ा भारतीय रस्त्यांवर अगदी मुबलक प्रमाणात दिसू लागल्या आहेत. नवीन वर्षांत अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यातच मर्सिडीज कंपनीची नवीन एस क्लास गाडी बाजारपेठेत दाखल होत आहे. पूर्वीच्या एस क्लास गाडय़ांच्या तुलनेत या गाडीच्या दिसण्यात आणि तंत्रज्ञानात खूपच बदल करण्यात आला आहे. पुढील ग्रील थोडं मोठं ठेवण्यात आलं असून गाडीचं रूफही अधिक डौलदार ठेवण्यात आलं आहे. या गाडीची अंतर्गत सजावटही खूप भन्नाट असेल. पारंपरिक इन्स्ट्रमेण्ट पॅनल्सऐवजी गाडीत दोन मोठे कलर डिस्प्ले असतील. त्याशिवाय गाडीची अंतर्गत सजावट लेदर, लाकूड आणि अत्यंत उच्च दर्जाचं प्लॅस्टिक यांच्या वापरातून केली असेल. गाडीची इंजिन क्षमता ४६६३ सीसी एवढी प्रचंड आहे. गाडीत सात गीअर असतील.
मर्सिडीज बेन्झ सीएलए
एकेकाळी परदेशी मोटार कंपन्यांमध्ये आपली मिरासदारी जपणाऱ्या मर्सिडीज बेन्झला आता बीएमडब्ल्यू आणि ऑडी या दोन जर्मन कंपन्यांनी मागे टाकलं आहे. पण तरीही या गाडय़ांचा रुबाब आजही कमी झालेला नाही. आता तर आपल्याच देशातील दोन कंपन्यांमुळे मागे पडलेल्या मर्सिडीज बेन्झने सीएलए ही नवीन गाडी बाजारात आणत भारतीय बाजारपेठेतील आपले स्थान भक्कम करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. अत्यंत पारंपरिक बांधणीमुळे ‘म्हाताऱ्यांची गाडी’ अशी ओळख झालेल्या मर्सिडीजने ही ओळख बदलण्याचा प्रयत्न या नव्या गाडीच्या माध्यमातून केला आहे. या नवीन गाडीचा तोंडवळा काहीसा ए क्लास गाडीसारखाच आहे. या गाडीची मागची बाजू घडवताना विशेष मेहेनत घेतली आहे. त्यामुळे गाडीचं बूट लीड (डिकी) आणि रिअर बम्पर हे वेगळे आहेत. मे २०१४ पर्यंत ही गाडी बाजारात येईल.
गाडीची किंमत ९० लाख ते १.१० कोटी

रेनॉ लगुना
रेनॉ या फ्रान्समधील कंपनीची रेनॉ लगुना ही भारतीय बाजारपेठेतील पाचवी गाडी असेल. याआधी फ्लुएन्स, डस्टर, स्काला आणि पल्स या गाडय़ांनी भारतीय बाजारपेठेतील नाडी ओळखल्यानंतर रेनॉ आता लगुना ही एक्झिक्युटिव्ह सेडान घेऊन येत आहे. ही गाडी मार्च २०१४पर्यंत भारतात दाखल होणार आहे. रेनॉच्या डस्टर या गाडीला भारतात स्वप्नातीत यश मिळालं. मात्र रेनॉ लगुनाची स्पर्धा फोक्सव्ॉगन पॅसॅट, स्कोडा सुपर्ब, होंडा अ‍ॅकॉर्ड अशा गाडय़ांशी असेल. या गाडीचे इतर स्पेसिफिकेशन्स कंपनीने अजूनही उघड केलेले नाहीत. मात्र ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन्सबरोबर उपलब्ध असेल. तसेच ऑटोमॅटिक गीअर्सही गाडीची शान वाढवतील.
गाडीची किंमत – १८ लाख ते २५ लाख

गाडीची किंमत  २५ लाख ते ३० लाख.

मारुती सुझुकी वायएल१
येत्या वर्षभरात मारुती सुझुकी आपली एसएक्स४ ही सेडान गाडी बाजारातून हद्दपार करणार आहे. या गाडीची जागा घेण्यासाठी मारुती सुझुकीने एक नवीन गाडी तयार केली असून त्या गाडीचे परीक्षण सध्या चालू आहे. परीक्षणादरम्यान या गाडीला वायएल१ हे नाव देण्यात आले आहे. ही गाडी २०१४च्या मध्यावर बाजारात दाखल होईल, असा ऑटोतज्ज्ञांचा अंदाज आहे. २०१३च्या एप्रिल महिन्यात झालेल्या शांघाई मोटर शोमध्ये मारुती सुझुकीने समोर आणलेल्या ऑथेंटिक्स या गाडीच्या धर्तीवरच वायएल१ आधारित असेल, असे समजते. या गाडीची अंतर्गत रचना ही एर्टिगासारखी असेल. तर गाडीचे बाह्यरूप हे थोडेफार स्विफ्टच्या वळणावर जाईल. डोअर पॉकेट्स, ग्लोव्ह बॉक्स, क्लायमेट कंट्रोल एसी, स्टेअरिंग व्हीलवरच असलेले कंट्रोल्स या फिचर्समुळे गाडी आरामदायक असल्याची खात्रीच मिळते. या गाडीच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये १.४ लिटर के सीरिजचे इंजिन असेल, तर डिझेल व्हर्जनमध्ये १.३ लीटर टबरेचाज्ड इंजिनचा समावेश असेल.
गाडीची किंमत – १८ लाख ते २५ लाख

होंडा अ‍ॅकॉर्ड डिझेल
होंडाच्या या एक्झिक्युटिव्ह सेडान गाडीने भल्याभल्या कंपन्यांसाठी आव्हान उभे केले. या गाडीने मर्सिडीज आणि ऑडीलाही आव्हान दिले. अल्पावधीतच ही गाडी भारतातील रस्त्यांवर प्रचंड यशस्वी ठरली. आता होंडाने ही गाडी डिझेल व्हेरियंटमध्येही आणण्याचा निर्णय घेतला असून नोव्हेंबर २०१४ पर्यंत डिझेल इंजिनसह गाडी भारतीय बाजारपेठेत येईल. आता या गाडीत २.२ फोर सिलिंडर डिझेल इंजिन असेल. सध्या हे इंजिन युरोपमध्ये धावणाऱ्या होंडा सीआर-व्ही आणि अ‍ॅकॉर्ड या गाडय़ांना आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत असलेल्या स्कॉडा सुपर्ब डिझेल, फोक्सव्ॉगन पसॅट, बीएमडब्ल्यू ३ सिरीज, मर्सिडिज सी क्लास, ऑडी ए४ अशा गाडय़ांना स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. मात्र ही गाडी भारतीय बाजारपेठेत आल्यावर फार खळबळ उडणार नाही, असे मत ऑटोतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गाडीची इंजिनक्षमता २१९९ सीसी असेल.  ६ स्पीड मॅन्युअल गीअर असलेल्या या गाडीची आसनक्षमता पाच असेल.
गाडीची किंमत- २० लाख ते २५ लाख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 9:09 am

Web Title: top sedans in india
Next Stories
1 अपघातग्रस्ताला मदत हा तर मूलभूत हक्क
2 ऑडी ड्रीम कार..
3 इंजिनदादा..
Just Now!
X