03 March 2021

News Flash

मारुती सुझुकीची वॅगन

मारुती सुझुकीची वॅगन आर ही सध्याची कम्प्लिट फॅमिली कार म्हणून गणली जाते. पाच जणांच्या कुटुंबासाठी आरामदायी आणि किफायतशीर असलेली ही कार म्हणूनच लोकप्रिय आहे. मायलेज

| July 31, 2015 04:03 am

मारुती सुझुकीची वॅगन आर ही सध्याची कम्प्लिट फॅमिली कार म्हणून गणली जाते. पाच जणांच्या कुटुंबासाठी आरामदायी आणि किफायतशीर असलेली ही कार म्हणूनच लोकप्रिय आहे. मायलेज चांगला, चालवायला सोपी, दिसायला चांगली ही सर्व गुणवैशिष्टय़े असलेली वॅगन आर आता नव्या स्वरूपात सादर होणार आहे. फॅमिली कारचे रूपांतर आता मल्टिपर्पज व्हेइकल अर्थात एमपीव्हीमध्ये होणार आहे..

उपलब्ध व्हर्जन्स
एलएक्सआय, व्हीएक्सआय एबीएस, व्हीएक्सआय सीएनजी,
एलडीआय, व्हीडीआय
इंजिन
पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी असे पर्याय उपलब्ध आहेत. इंजिन के सीरिजसह एक लिटर तीन सििलडरमध्ये उपलब्ध असेल. एक हजार सीसीचे इंजिन असेल. पिकअप चांगला असेल. पेट्रोल व्हर्जनला १९ किमी प्रतिलिटर, सीएनजी व्हर्जनला २५ किमी तर डिझेल व्हर्जनला २३ किमी मायलेज देण्याची शक्यता आहे.
आपल्याकडे सहकुटुंब सहपरिवार फिरायला जाण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. स्वतची गाडी असेल तर मग आपणच आपले मनाचे राजे असतो. मात्र, प्रत्येकवेळी गाडी मोठी असेलच असे नसते. मग ज्यांच्याकडे छोटय़ा गाडय़ा आहेत, त्यांचा नाइलाज होऊन ते एखादी मोठी गाडी भाड्याने घेतात आणि हौस भागवून घेतात. इनोव्हा, स्कॉíपओ, तवेरा अशा गाडय़ा असतात त्यांच्या सोयीसाठी. मात्र, अलीकडे आता या गाडय़ांना टक्कर देऊ शकणा-या गाडय़ाही बाजारात आल्या आहेत. अर्टगिा, मोबिलिओ, एन्जॉय यांनी हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. डॅटसनच्या गो प्लस या कारचेही यात नाव घेता येईल. आता या यादीत वॅगन आर एमपीव्हीची भर पडणार आहे.
सात आसनी वॅगन आरचे मुखदर्शन सर्वात आधी २०१३ मध्ये इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय मोटर शोमध्ये झाले होते. मात्र, त्यावेळी ही फक्त कन्सेप्ट कार असेल, अशी वदंता होती. परंतु आता मारुती सुझुकी वॅगन आर एमपीव्हीचे उत्पादन करणार असून पुढील वर्षी भारतात ही कार उपलब्ध असेल. वॅगन आरला भारतात सर्वाधिक मागणी असल्याने एमपीव्हीचे लाँचिंगही भारतातच करण्याचा कंपनीचा मानस आहे. ही गाडी थेट डॅटसन गो प्लसशी स्पर्धा करणार आहे. सद्यस्थितीत एमपीव्ही सेगमेंटमध्ये डॅटसन गो प्लसला अधिक मागणी आहे. हिची किंमतही (साडे पाच लाखांहून पुढे) फारशी नाही. वॅगन आर एमपीव्ही ही गाडीही याच किमतीत उपलब्ध असेल. सध्याच्या वॅगन आरमधील अनेक फीचर्स नव्या अवतारात असतील.
लांबी-रुंदी
लांबी तीन हजार ९९० मीटर असेल तर उंची १७६० मीटर असेल. रुंदीला ही गाडी १५९५ मीटर असेल. वॅगन आर एमपीव्हीचे वजन एक हजार किलो असेल. व्हील्स अर्टगिासारखेच
१५ इंचाचे असतील.
किंमत
सहा ते साडेसात लाख (एक्स-शोरुम)
अंतरंग
सध्या मारुती सुझुकीच्या अर्टगिाने इनोव्हाला चांगले आव्हान दिले असले तरी या एसयूव्हीची किंमत अंमळ जास्त असल्याने खप थोडा कमी आहे. यातूनच मार्ग काढत वॅगन आर एमपीव्हीची रचना करण्यात आली आहे. हिचे अंतरंग अर्टगिासारखेच असण्याची शक्यता आहे. आसनांच्या तीन रांगा असतील. मागील आसनावर दोघेजण बसू शकतील. मात्र, उंच व्यक्तींना थोडा त्रास सहन करावा लागेल. परंतु मधल्या रांगेत तीन उंच लोक आरामात बसू शकतील, अशी रचना आहे. आर्मरेस्ट आणि हेडरेस्ट नसतील. जास्तीचे सामान असल्यास मागील सीट फोल्ड करून जागा करण्याची सोय वॅगन आर एमपीव्हीमध्ये असेल. बाहेरून ही गाडी इनोव्हासारखीच दिसणारी असेल. दोन एअरबॅग्ज यात असतील. तसेच रीअर एसीची व्यवस्थाही असेल.
फायदे
गाडीचा आकार आटोपशीर असल्याने वाहतूक कोंडीत अडकले तरी नीट हाताळता येईल
अंतर्गत आसनव्यवस्था प्रशस्त आहे
मेन्टेनन्स कमी आणि मायलेज जास्त
जास्तीचे वजन वाहून नेऊ शकेल
परवडण्याजोगी किंमत
विक्रीनंतरची सेवा उत्तम
तोटे
बाहेरील लूक जरा आणखी सुधारता येऊ शकेल
सेफ्टी फीचर्स सुधारता येतील
इंजिन क्षमता वाढवणे शक्य
गाडीचे लाँचिंग
जुलै, २०१६
टिप
अर्टगिा आकाराने मोठी आणि किमतीने परवडणारी नसल्याने ही कार कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये बाजी मारू शकेल. ही गाडी वजनाने हलकी असली तरी स्टर्डी कार असेल.
समीर ओक
ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 4:03 am

Web Title: wagon r
Next Stories
1 बोल्ड नव्हे स्मूथ.. टाटा बोल्ट
2 कलाcar : नॅनो कारशी नाते
3 माझी कारकीर्द : गाडी चालविण्याचे पॅशन –
Just Now!
X