News Flash

चलती का नाम गाडी..

इंधनाच्या दरात चढउतार, डॉलरच्या तुलनेत सतत घसरत जाणारा रुपया, वाढती महागाई, जाचक सरकारी नियम-अटी या सर्व दुष्टचक्रात अडकलेल्या

| December 27, 2013 12:39 pm

चलती का नाम गाडी..

इंधनाच्या दरात चढउतार, डॉलरच्या तुलनेत सतत घसरत जाणारा रुपया, वाढती महागाई, जाचक सरकारी नियम-अटी या सर्व दुष्टचक्रात अडकलेल्या वाहन उद्योगाला यंदाचे वर्ष तसे कठीणच गेले. आणखी चार दिवसांनी हे वर्ष संपेल. नवीन वर्षांत काहीतरी नवीन घडेल या आशेवर हा उद्योग आहे. वर्षांच्या सुरुवातीलाच ऑटो एक्स्पो नवी दिल्लीत होणार आहे. त्यामुळे सध्या तरी या क्षेत्रात उत्साह आहे. या वर्षांत कोणत्या गाडय़ांची चलती होती याचा हा मागोवा..
फोर्ड इकोस्पोर्ट
यंदाच्या वर्षी जूनमध्ये फोर्डने इकोस्पोर्ट ही एसयूव्ही लाँच केली. चारजणांसाठी मस्त आरामशीर असलेल्या इकोस्पोर्टने अल्पावधीतच चांगलीच लोकप्रियता मिळवली. लाँचिंगच्यावेळी इकोस्पोर्टची किंमत साडेपाच लाखांपर्यंत होती. मात्र, रुपयाच्या अवमूल्यनामुळे तिच्या किंमतीत ३० ते ४० हजार रुपयांनी वाढ झाली. दीड लिटर पेट्रोल इंजिनच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेली ही गाडी अजूनही ग्राहकांची पसंती टिकवून आहे.
मिहद्रा एक्सयूव्ही ५००
मिहद्राच्या एक्सयूव्ही५०० ने यंदा एसयूव्ही मार्केटमध्ये उत्तुंग भरारी घेतली. इतर सर्व स्पर्धकांच्या तुलनेत एक्सयूव्ही५०० ची कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. यंदाची बेस्ट सेिलग एसयूव्ही असा किताब या गाडीला मिळाला तरी हरकत नाही. दणकट पण तेवढेच आकर्षक बाह्यरुप, त्याहून भन्नाट अंतर्गत सजावट अशा एक्सयूव्ही ५०० ने २०१३ मध्ये मिहद्र मोटर्सला चांगली उभारी दिली आहे.
मारुती एर्टगिा
टोयोटा इनोव्हाला टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकीने बाजारात आणलेल्या एर्टगिा या मल्टिपर्पज व्हेइकलने (एमपीव्ही) यंदाच्या वर्षांत प्रचंड लोकप्रियता मिळवली. साडेसहा लाखांपासून ते आठ लाखांपर्यंत उपलब्ध असलेल्या एर्टगिाचे सीएनजी व्हर्जनही लोकप्रिय ठरले. इनोव्हाच्या तुलनेत स्वस्त आणि आकर्षक असलेल्या एर्टगिाने लाँचिंगनंतर अल्पावधीतच कारप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तीनही प्रकारांतील एर्टगिाने यंदाच्या वर्षांत मारुतीला चांगलाचा हात दिला हे नक्की.
रेनॉ डस्टर
रेनॉची डस्टरही यंदा कारप्रेमींच्या पसंतीला उतरली. पुढील वर्षी दिल्लीत होत असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आता डस्टरची पुढील आवृत्ती लाँच होणार आहे. मात्र, यंदाच्या वर्षी या गाडीने खपाच्या बाबतीत रेनॉ इंडियाला चांगलाच हातभार लावला. ड्युएल टोन क्रोम ग्रील, डेलाइट रिनग लॅम्प्स, रिस्टाइल्ड टेललॅम्प्स, क्रोम टिप्ड एक्झॉस्ट पाइप यामुळे डस्टर अधिकाधिक आकर्षक ठरली. गाडीची अंतर्गत सजावटही आकर्षक करण्यात आली आहे. या गाडीची किंमत आठ ते दहा लाखांच्या घरात आहे.
ह्युंडाई ईऑन
मारुतीच्या अल्टोला टक्कर देणारी ह्युंडाई ईऑनने यंदा चांगली कामगिरी केली. हॅचबॅक प्रकारातल्या ईऑनने अल्टोला चांगली स्पर्धा दिली मात्र तिचा खप अल्टोच्या तुलनेत कमीच राहिला. त्यामुळे ईऑनमध्ये आणखी बदल करून तिला जूनमध्ये रिलॉँच करण्यात आले. त्यामुळे ईऑन चांगली कामगिरी बजावेल अशी ह्युंडाईला अपेक्षा आहे. आय१० आणि आय२० च्या तुलनेत ईऑनकडून ह्युंडाईला खूप अपेक्षा आहेत. पुढील वर्षी त्यांची पूर्तता होण्याची आशा आहे.
टाटा स्टॉर्म
टाटा मोटर्ससाठी यंदाचे वर्ष तसे कठीणच गेले. नॅनोच्या खपात वाढ नोंदवली गेली असली तरी इतरांच्या तुलनेत ही नगण्यच होती. मात्र, यंदा टाटाने सफारीची सुधारित आवृत्ती स्टॉर्म बाजारात आणली. त्यामुळे टाटा मोटर्सला थोडा का होईना पण फायदा झाला. एकेकाळी स्टेटस सिम्बॉल असलेल्या सफारीचे नवे रुप अर्थातच सर्वानाच भावले. आकर्षक बाह्यरुप आणि तेवढेच ग्राहकस्न्ोही अंतर्गत रुपामुळे टाटा स्टॉर्मने एसयूव्ही प्रकारांत अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली.
होंडा अमेझ
मंदीच्या चक्रातही यंदाचे वर्ष होंडा मोटर्ससाठी उभारी देणारे ठरले. होंडाच्या अमेझने बाजारात चांगली कामगिरी नोंदवली. यंदाच्या एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत लाँच झालेल्या अमेझने वर्षअखेरीस खपाचा चांगला आकडा पार केला. अमेझच्या किंमतीत आता आठ हजार रुपयांची वाढ झाली असली तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. सीआर-व्हीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. खपाच्या बाबतीत होंडा यंदा चौथ्या क्रमांकावर राहिली.
अल्टो ८००
कार तर घ्यायचीय पण जास्त महाग नको आणि परवडणारी हवी, अशी इच्छा असलेल्या मध्यमवर्गीयांना आजही मारुतीच आपलीशी वाटते. मारुतीनेही ग्राहकांच्या या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. त्यामुळेच मारुतीच्या अल्टो ८००ला कारप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. एन्ट्री लेव्हल कारच्या सेगमेंटमध्ये यंदाच्या वर्षांत अल्टोनेच बाजी मारली आहे. अवघ्या पावणेचार लाखांत उपलब्ध होणारी अल्टो ग्राहकांची लाडाची ठरली आहे. तीत आता ऑडिओ सिस्टीम सुरू करण्याचाही मारुतीचा विचार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2013 12:39 pm

Web Title: which brand works out in hard year for vehicle industry
Next Stories
1 लाँग ड्राइव्हचं वेड
2 आगामी काळ सुपरबाइकचाच
3 चलती का नाम गाडी..
Just Now!
X