* मी आपले सदर नियमित वाचतो. माझा रोजचा प्रवास २० ते ३० किमी आहे. आमच्या कुटुंबात चार माणसे आहेत. शेवरोले सेल हॅचबॅक पेट्रोल ही गाडी कशी आहे?
-राहुल कुलकर्णी
 * शेवरोले सेल एचबी ही उत्तम गाडी आहे. तिच्यातील फीचर्सही छान असून आतून ही गाडी प्रशस्त आहे. हिच्या अगदी साध्या श्रेणीतही एबीएस आणि एअर बॅग्ज यासारखे फीचर्स आहेत. शिवाय तीन वर्षांची वॉरंटी आणि विस्तारित दोन वर्षांची अधिक वॉरंटीही आहेच. सíव्हस नेटवर्क कमी असले तरी गाडय़ा उत्तम आणि स्ट्राँग आहेत. तुम्ही दुसरा पर्याय म्हणून टाटा बोल्ट किंवा फिगो यांचाही विचार करू शकता.
* सर, माझे बजेट चार ते पाच लाख आहे  मला पेट्रोलवर चालणारी, चांगला मायलेज देणारी गाडी हवी आहे. महिन्यात एक लांब अंतराची सहल करण्याची सवय आहे, पण रोज गाडी वापरत नाही. कृपया मार्गदर्शन करा.
  -विजय पाताळयंत्री, औरंगाबाद
 * डॅटसन गो प्लस ही तुमच्या बजेटात आरामात उपलब्ध होऊ शकते. नाही तर वॅगन आर हाही एक चांगला पर्याय आहे. पाच जणांसाठी डॅटसन योग्य आहे किंवा मग मारुती सेलेरिओचाही विचार करायला हरकत नाही.
* मी आयुर्वेदिक डॉक्टर असून मला महिन्यातून दोनदा तरी व्हिजिटिंग प्रॅक्टिससाठी बाहेर जावे लागते. माझ्या कुटुंबात सहा जण आहेत. सर्वासाठी योग्य ठरेल तसेच माझ्या कामासाठीही उपयोगी पडू शकेल अशी गाडी सुचवा. डॅटसन गो प्लस ही गाडी उपयुक्त ठरू शकेल का, परंतु माझे बजेट सहा लाखांपेक्षा जास्त नाही
-वैद्य अमोल खांडवे
* होय, डॅटसन गो प्लस ही मोठी कार असून प्रशस्तही आहे. तसेच तिची किंमतही जास्त आहे. तिचा मायलेज चांगला असून पाच लोकांसाठी ती उपयुक्त कार आहे. आणि लगेज स्पेसही चांगला आहे. पाच लाखांत तुम्हाला हव्या असलेल्या सर्व सुविधा या गाडीत आहेत. एबीएस मात्र उपलब्ध नाही, एअरबॅग्जची सुविधाही नाही. त्यामुळे तुम्हाला हायटेक कार घ्यायची असेल तर गो प्लस तुमच्यासाठी नाही.
समीर ओक
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.