News Flash

कोणती कार घेऊ?

’सध्या मी सँट्रो एलपीजी (फॅक्टरी फिटेड) जीएलएस मॉडेल वापरतो आहे.

’मला चांगला मायलेज देणारी, चांगली दिसणारी, आरामदायी, ऑफ रोडही धावणारी अशी कार हवी आहे. माझे बजेट ७५ लाख रुपये आहे.

’सध्या मी सँट्रो एलपीजी (फॅक्टरी फिटेड) जीएलएस मॉडेल वापरतो आहे. २००८ पासून मी ही गाडी चालवत असून आतापर्यंत सवा लाख किमी फिरणे झाले आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग दीड ते दोन हजार किमी आहे. मला आता नवीन कार घ्यायची आहे. कार्यालयीन व घरगुती वापरासाठी गाडी घ्यायची आहे. कुटुंबात सहा जण आहोत. माझे बजेट सहा ते सात लाख रुपये आहे.
– लक्ष्मीकांत शिंदे, पुणे

’सहा ते सात लाखांत तुम्हाला हॅचबॅक डिझेल मॉडेल निवडावे लागेल. तुम्ही नवीन फोर्ड फिगो घ्या किंवा मग होंडा अमेझ आयडीटेक या गाडीला प्राधान्य द्या.

’मला चांगला मायलेज देणारी, चांगली दिसणारी, आरामदायी, ऑफ रोडही धावणारी अशी कार हवी आहे. माझे बजेट ७५ लाख रुपये आहे.
– प्रगती शेळके

’मी तुम्हाला व्होल्वो एक्ससी-९० हे मॉडेल सुचवेन. ही वर्ल्ड क्लास ऑफ रोड गाडी आहे. हिने बीएमडब्ल्यू एक्स ५ वगैरे गाडय़ांनाही या श्रेणीत मागे टाकले आहे.

’माझे बजेट सात लाख रुपये आहे. मी ह्य़ुंदाई अ‍ॅक्सेंट, स्विफ्ट डिझायर, फिगो अस्पायर, टाटा झेस्ट यांपैकी कोणती गाडी घेऊ?
– अंजली देवगांवकर

’पेट्रोल गाडी घ्यायची असेल तर तुम्ही स्विफ्ट डिझायर ही गाडी घ्यावी. हॅचबॅकमध्ये पोलो ही उत्तम आरामदायी गाडी आहे. डिझेलमध्ये फोर्ड अस्पायर ही गाडी चांगली आहे.

’माझे बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. आम्ही कुटुंबात पाच जण आहोत. माझा रोजचा प्रवास फार काही जास्त नाही. मला कमी मेन्टेनन्स असलेली कार घ्यायची आहे. ह्य़ुंदाई ईऑन किंवा शेवरोले बीट यांपैकी कोणती गाडी तुम्ही सुचवाल?
– संदीप शेळके

’ह्य़ुंदाई ईऑन मॅग्ना प्लस ही गाडी उत्तम आहे; पण ही गाडी लहान असल्याने चार लोकांसाठी ठीक आहे. मोठी गाडी हवी असल्यास नुकतीच लाँच झालेली रेनॉ क्विड ही टॉप मॉडेल गाडी घ्यावी.

’माझ्याकडे मारुती वगन आर डय़ुओ गाडी आहे. मला आता नवीन गाडी घ्यायची असून माझे बजेट चार लाख रुपये आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग एक हजार किमीचे आहे. क्विड गाडी घ्यावी का?
– तानाजी गोगावले

’क्विड ही गाडी उत्तम आहे. मात्र तिची पॉवर जरा कमी आहे. तुम्ही या बजेटमध्ये ह्य़ुंदाई ईऑन ही गाडी घ्यावी.

’माझा रोजचा प्रवास ४०-५० किमीचा आहे. मी गेल्या सात वर्षांपासून ह्य़ुंदाई आय१० वापरतो आहे. मला आता नवीन गाडी घ्यायची असून माझे बजेट सात ते आठ लाख रुपये आहे.
– आर. वैद्य

’मी तुम्हाला डिझेल कार घेण्याचा सल्ला देईन. तुम्ही फोर्ड अस्पायर ही डिझेल गाडी घ्यावी किंवा मग ऑटो ट्रान्समिशनमध्ये टाटा झेस्ट एक्सएमए ही गाडी घ्यावी.

’सर, तुमचे ह्य़ुंदाई आय२० अ‍ॅक्टिव्ह १.२ एक्स व्हर्जन या मॉडेलबद्दल आपले मत काय आहे? स्कोडा चांगला पर्याय ठरेल का? अ‍ॅक्टिव्हचा ग्राऊंड क्लिअरन्स १९० आहे, तर स्कोडाचा कमी आहे. दोघींची किंमत मात्र सारखीच आहे. कृपया आपले मत सांगा.
– डॉ. देवानंद देशमुख

’मी तुम्हाला ह्य़ुंदाईची क्रेटा ही नवीन गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी आय२० पेक्षा मोठी असून जास्त ताकदवान आहे किंवा मग महिंद्रा टीयूव्ही३०० ही गाडीही चांगली आहे. या दोन्ही गाडय़ा बाजारात उपलब्ध आहेत.

’मी २०१५चे फोर्स ट्रॅव्हलर हे मॉडेल पाहिले आहे. ती मी घेऊ की नको. मला व्यवसायासाठी गाडी घ्यायची आहे. गाडी घेताना कोणती काळजी घेऊ? या गाडीची किंमत काय आहे?
– चिंतामणी कुलकर्णी

’गाडी नवीच असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. फोर्सची सगळीच मॉडेल्स चांगली आहेत. मात्र, आता त्यात एबीएस आणि ईबीडी पॉवर स्टीअरिंगवाले पर्यायही उपलब्ध होऊ लागले आहेत. ते या गाडीत आहेत की नाहीत हे पाहून घ्या.

या सदरासाठी तुमचे प्रश्न ’ ls.driveit@gmail.com  वर पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 3:08 am

Web Title: which car to buy 22
Next Stories
1 हमर एच २
2 वाहन चालवण्याचे विधिग्रा नियम
3 कोणती कार घेऊ?
Just Now!
X