’मला पुढील वर्षी गुढीपाडव्यापर्यंत गाडी घ्यायची आहे. माझे बजेट साधारण तीन-साडेतीन लाख रुपये आहे. मारुती के१० सीएनजी घ्यायचा माझा विचार आहे. कारण तिचा मायलेज ३२ किमी आहे. परंतु एक अडचण अशी आहे की, या गाडीत एअरबॅगची सुविधा नाही. मला मात्र सुरक्षा देणारी आणि दीर्घकाळ टिकणारी कार घ्यायची आहे. या गाडीविषयी तुमची मतं सांगा.
    – देवेश शुक्ल
ca01* सीएनजीवर चालणारी आणि त्यात एअरबॅगची सुविधा असणारी गाडी आजपर्यंत तरी आलेली नाही. अल्टो के१० ही चांगली गाडी आहे परंतु एअरबॅग असणे हे तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक वाटत असेल तर तुम्ही तुमचे बजेट वाढवून बाहेरून सीएनजी किट लावू शकता.
* आम्हाला सात आसनी कार घ्यायची आहे. आमचे बजेट सात ते आठ लाख रुपये आहे. कृपया गाडी सुचवा.
 – शीतल कद्रेकर
  * होंडा मोबिलिओ, अर्टगिा, चेव्ही एन्जॉय या सात आसनी गाडय़ा आहेत. यापकी मोबिलिओ ही सर्वोत्तम कार आहे. हीच निवडा. तसेच तिचा मायलेजही चांगला आहे. पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट्समध्ये तर ती उपलब्ध आहेच शिवाय तिच्यातील फीचर्सही चांगले आहेत.
* मी मुंबईत राहातो आणि परदेशात नोकरी करतो. मी वर्षांतून दोनदा मुंबईत येतो. मला आठ आसनी कार घ्यायची आहे. कुटुंबियांसह गावी जाण्यासाठी किंवा भटकंती करण्यासाठी मला अशी गाडी घेता येईल काय. कोणती कार तुम्ही सुचवाल.
 – नितीन महाडिक, मुंबई.
ca02* तुम्ही वारंवार कार वापरत नसाल आणि वर्षांतील काही महिने ती नुसतीच दारासमोर उभी असेल तर तुम्ही अर्थातच पेट्रोल कारचाच विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आठ जणांसाठी गाडी घ्यायची आहे. यात दोनच पर्याय उपलब्ध आहेत. एक टोयोटा इनोवा आणि शेवरोले एन्जॉय. टोयोटा इनोवा २.० पेट्रोल व्हर्जन गाडी आदर्श ठरेल. अर्थात तिचे बजेट १२ लाख रुपये आहे. शेवरोले एन्जॉय ही गाडीही छान आहे. आठ जणांसाठी ती कम्फर्टेबल आहे. शिवाय हायवेवर तिचा मायलेज साडेबारा किमी प्रतिलिटर इतका आहे.
’मला गाडी घ्यायची आहे. माझे महिनाभराचे ड्रायिव्हग किमान ६०० किमी आहे. मी पेट्रोल गाडी घ्यावी की डिझेल, याबाबत माझा गोंधळ होत आहे. पेट्रोल गाडी घेणे मला परवडेल काय. टाटा झेस्ट चांगली की ह्य़ुंडाई एक्सेंट.
 – माधुरी गिरे.
ca03*तुम्ही दरमहा एक हजार किमीपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करत असाल तरच डिझेल गाडी घ्या. नाही तर पेट्रोल कार हाच पर्याय योग्य आहे. ह्य़ुंडाई एक्सेंट ही चांगली गाडी आहे. झेस्ट ही नवीन गाडी असल्यामुळे तिच्या पेट्रोल इंजिनाविषयी फारशी माहिती नाही. तुम्ही एक्सेंटशिवाय आय २० किंवा मारुती स्विफ्ट यांचाही विचार करू शकता.
’मी व्यवसायाने पशुवैद्य आहे. मला दररोज कामानिमित्त १५ ते २० किमी अंतर ड्रायिव्हग करावे लागते. तसेच वर्षांतून एकदोनदा तरी आमचा लांबचा प्रवास होतो. मला स्विफ्ट आणि इटिऑस लिवाबद्दल तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. यापकी कोणती सर्वोत्तम कार आहे. तसेच मारुती सेलेरिओबद्दल तुमचे मत काय आहे.
– डॉ. नीतेश कदम
*स्विफ्ट आणि इटिऑस लिवा या दोन्ही गाडय़ा तुमच्यासाठी योग्य आहेत. मात्र, तुम्हाला स्पेशियस गाडी पाहिजे असेल, म्हणजे पाच मोठी माणसे अगदी सहज बसता यायला हवी असतील तर इटिऑस लिवा हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर मारुतीची गाडीच हवी असेल तर स्विफ्टच घ्यावी. तिचे सस्पेन्शन खूप आरामदायी आहे आणि मायलेजही लिवापेक्षा जास्त आहे. सेलेरिओमध्ये स्पेस आणि कम्फर्ट या दोन्हीची थोडी कमतरता भासते. पण पाच माणसे जर सारखी फिरत नसतील तर स्विफ्टच घ्या. कारण तिचा व्हील डाय मोठा आहे आणि खराब रस्त्यांवरही खूप आराम मिळतो.
* मी सरकारी नोकरीत कार्यरत आहे. मला नवीन झायलो एच-९ ही सात आसनी कार घ्यायची आहे. माझ्याकडे सध्या सँट्रो िझग एक्सओ हे टॉप एन्ड मॉडेल असून गेल्या नऊ वर्षांत ४४ हजार किमी रिनग झाले आहे. माझ्या कुटुंबात पाच जण आहेत तसेच ९० वर्षांची आईही आहे. मी आधी डस्टर, स्कॉíपओ, टेरेना, इकोस्पोर्ट, अर्टिंग, इनोवा, मोबिलिओ या गाडय़ांचा विचार केला होता. अखेरीस झायलो एच-९ घेण्याचा निर्णय घेतला. माझा निर्णय योग्य आहे का.
– सुहास फडके, कराड
* झायलो एच-९ हे एक सुंदर मॉडेल आहे. या गाडीचा कम्फर्ट म्हणजे स्वर्गाची अनुभूती आहे. परंतु तुम्ही गेल्या नऊ वर्षांत ४४ हजार किमीचे रिनग केले आहे. जरा कमीच वाटते हे. डिझेल झायलोच्या मानाने खूपच कमी आहे. तसेच ९० वर्षांची वयोवृद्ध व्यक्ती एवढय़ा उंच गाडीत कशी बसू शकेल, याचाही विचार व्हायला हवा. तुम्हाला तुमच्या नव्या गाडीला फूट स्टेप्स जोडाव्या लागतील, दोन्ही बाजूला. तुम्ही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर लांबच्या प्रवासाचाही विचार करा. तरच तिचा परिपूर्ण उपयोग होऊ शकेल. टेरेनो आणि डस्टर या पाच आसनी गाडय़ा असून तुमच्या गरजेसाठी योग्य आहेत.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.