मला कार्गो आणि पॅसेंजर कारने वाहतूक करायची आहे. मला टाटा सुमोमध्ये जसे शेवटच्या आसनावर समोरासमोर चौघे जण बसू शकतात तसे मला स्कॉíपओमध्ये करता येईल का? टाटा सुमो आणि शेवरोले एन्जॉयमध्ये सगळ्यात जास्त मायलेज कोण देते. एमयूव्ही सेगमेंटमध्ये आणखी कोणत्या कार आहेत. सुमो दीर्घकाळ वापरासाठी चांगली असते का.
– सुभाष बबन
’माझ्या मते सुमो ही गाडी विश्वासार्ह नाही. तुम्ही मिहद्रा झायलो किंवा क्वांटो घ्यावी. त्यात जास्त जागा आहे. आणि आरामही मिळतो. मायलेजही तुम्हाला १४-१५ किमी प्रतिलिटर मिळेल. बजेट कमी असेल तर बोलेरो घ्यावी.
’सर, माझे बजेट चार लाख रुपयांपर्यंत आहे. अल्टो ८०० किंवा डॅटसन गो यापकी कोणती गाडी घेणे सोयीस्कर ठरेल. मी ग्रामीण भागात राहतो आणि माझा महिन्याचा प्रवास १०० किमीपेक्षा जास्त नाही.
– तन्वीर शेख, अहमदनगर
’तुम्ही जर कार जास्त वापरत नसाल तर अल्टो के १० योग्य आहे आणि थोडी मोठी गाडी हवी असेल तर डॅटसन गो प्लस ही गाडी घ्यावी.
’माझ्याकडे सध्या मारुती रिट्झ एलडीआय ही गाडी आहे. २०११ पासून मी ती वापरतो आहे. मला आता कार बदलायची असून मला टाटा बोल्ट आवडते. माझा महिन्याचा प्रवास १३०० ते १५०० किमी आहे.
– विक्रम, नाशिक
मी तुम्हाला फियाट पुन्टो किंवा निस्सान मायक्रा डिझेल या गाडय़ा सुचवील. या दोन्ही गाडय़ा चांगल्या आहेत. सेडान हवी असेल तर निस्सान सनी चांगली आहे. तिचे दीड लिटर क्षमतेचे इंजिन शक्तिमान आहे.

 

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.