माझी उंची सहा फूट आहे. आमच्या घरात आम्ही एकूण पाचजण आहोत. आम्हाला फिरायची खूप आवड आहे. कृपया आमच्यासाठी चांगली गाडी सुचवा. सेकंड हँड आणि डिझेलवर चालणा-या गाडीला प्राधान्य आहे.
    – अतुल राऊत

* अतुलजी तुम्ही म्हणता तुमची उंची खूप आहे, तसेच तुम्हाला आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी डिझेलवर चालणारी आणि सेकंड हँड गाडी हवी आहे. त्यासाठी तुमचा सर्वोत्तम पर्याय इनोव्हा आहे. तुम्हाला ही एसयूव्ही परवडू शकेल. ती पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. टोयोटाच्या डीलरकडे चौकशी केल्यास सेकंड हँड इनोव्हा मिळू शकते. सेकंडहँड गाड्यांना मेन्टेनन्स असतोच. फक्त तो किती लागेल, त्याचा खर्च किती इत्यादी तुमच्या एकूण प्रवासावर अवलंबून असेल.

* मी कोचिंग क्लासेस चालवतो. माझा रोजचा प्रवास ६० किमीचा आहे. माझे बजेट सात लाख रुपयांचे आहे. डिझेलवर चालणारी कोणती कार घ्यावी?
– राजेश सप्रे

– तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ह्युंदाई आय१० घ्यायला काहीच हरकत नाही. उलट ती तुमच्या बजेटपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. तुमचा रोजचा एकंदर प्रवास पाहता आय10 सारखी कम्फर्टेबल गाडी नक्कीच चांगला पर्याय आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था असल्याने गाडीचा मेन्टेनन्स जास्त होईल, हे खरे.

* माझे बजेट दहा ते १५ लाख रुपये आहे. मला एसयूव्ही घ्यायची आहे दूरच्या प्रवासासाठी. काय करावे, कोणती कार घ्यावी.
    – सुहास क्षीरसागर

– एसयूव्हीविषयीही तुम्ही विचारले आहे. तुमच्या बजेटात तुम्हाला इनोव्हा उपलब्ध होऊ शकते, मारुतीची अर्टगिाही आहे, शेवरोलेची एन्जॉय आहे शिवाय पुढच्या महिन्यात होंडाची मोबिलिओही दाखल होत आहे. यापकी कोणतेही मॉडेल तुम्ही घेऊ शकता.

* मी औरंगाबादेत फायनान्शिअल कन्सल्टंट म्हणून काम करतो. व्यवसायाच्या निमित्ताने माझे फिरणे होते. मला साडेतीन लाखांपर्यंत कोणती कार घेणे योग्य ठरेल.
– विजय जोशी

– तुमच्या बजेटमध्ये बसू शकेल अशी मारुतीची अल्टो ही कार आहे. बजेट थोडे वाढवले तर निस्सानची डाटसन गो ही डाटसनची बाजारात नवीन आलेलीहॅचबॅकही तुमच्या बजेटमध्ये येऊ शकेल. दोघांचाही पिकअप आणि एॅव्हरेज चांगला आहे.

* मला नवीन एसयूव्ही किंवा सेडान घ्यायची आहे. कोणती कार सुचवाल?
– प्रवीण पाटील

– तुम्ही फक्त तुमचे बजेट सांगितले आहे. तुमचा रोजचा प्रवास किती वगरेचा उल्लेख नाही. असो. तरीही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्हाला लक्झरिअस गाडी हवी आहे. त्यासाठी तुमच्यापुढे सेडान म्हणून होंडा, मारुती सुझुकी, टोयोटा, शेवरोले, फियाट यांच्या गाड्यांचा पर्याय उपलब्ध आहे. एसयूव्हीमध्ये सध्या तरी इनोव्हाच चांगला पर्याय आहे.