1. मला शहरात चालवण्यासाठी कार हवी आहे. मी मारुती सेलेरिओ किंवा मग ुंदाई ईऑनचा विचार करतोय. यापकी कोणती गाडी योग्य ठरेल?  – माधव ठाकूर, कोल्हापूर
– ’या दोघींपकी ईऑन ही स्वस्त कार आहे. सेलेरिओ ही इंजिन, मायलेज वगरेच्या बाबतीत चांगली कार आहे. तुम्ही ऑटो कारच्या शोधात असाल तर सेलेरिओ ही सर्वोत्तम आहे. तसेच तुम्ही आय१० सारख्या इतरही पर्यायांचा विचार करू शकता, कारण या गाडय़ाही चांगल्या आहेत आणि थोडय़ा जड आहेत.

2. नमस्कार सर, मी माझ्या कुटुंबासह महिन्याला साधारण ५००-८०० कि.मी. प्रवास करतो. माझी तयारी रु. २,००,०००/- ची आहे. मला कृपया हॅचबॅक किंवा कॉम्पॅक्ट श्रेणीतील चार अधिक एक क्षमता असणारी व चांगला मायलेज देणारी जुनी (अल्टो व्ॉगनआर, इंडिका  शक्यतो वगळून) पेट्रोल कार सुचवा. कार २-३ वष्रे जुनी, पण वेल मेन्टेन्ड हवी आहे, जेणेकरून पुढेही मेन्टेनन्स जास्त वाढू नये. जुनी कार घेताना काय निकष असावेत व काळजी काय घ्यावी? मुंबईत खात्रीलायक व स्वस्त कार मिळेल का? – प्रशांत मुसळे, अमरावती<br />– प्रशांतजी, दोन लाखांत दोन-तीन वर्षे वापरलेली आणि पाच आसनी गाडी म्हणजे सँट्रो; परंतु सेकंड-हँडच गाडी घ्यायची असेल तर शक्यतो होंडा ब्रियो घ्या, परंतु ती तीन लाखांपर्यंत मिळेल. दोन लाखांत तुम्हाला शेवरोले बीट मिळू शकेल. जुनी गाडी घेताना सर्वात पहिले इन्शुरन्स पाहावा, इंजिनाचा आवाज जास्त येत नाही ना, ब्रेक्स पॉवरफूल आहेत ना इत्यादीची खात्री करून घ्या. तसेच सíव्हसिंगचे रिपोर्ट्सही पाहावेत. पुण्या-मुंबईत नक्की चांगल्या गाडय़ा मिळतील. मिहद्रा फर्स्ट चॉइस किंवा क्विकरवर पाहाव्यात.

3. एसी लावल्याने गाडीच्या मायलेजमध्ये कितीसा फरक पडतो? – हेमंत कौसडीकर, परभणी<br />– तुम्ही शहरात किंवा ट्रॅफिकमध्ये एसी लावत असाल तर गाडीच्या मायलेजमध्ये साधारणत: तीन ते चार किमी प्रतिलिटर एवढा फरक पडू शकतो; पण तुम्ही हायवेला गाडी चालवत असताना एसी लावाल तर काहीही फरक पडत नाही. पडलाच तर एक किमी प्रतिलिटर एवढा असतो. तुम्ही ताशी ८० किमी वेगाला गाडीच्या काचा उघडय़ा ठेवल्या तर मायलेज दोन किमी प्रतिलिटरने कमी होतो. त्यामुळे हायवेवर एसी लावलाच पाहिजे. थंडी असो वा पाऊस, एसी सुरू हवाच.

4. मला महिनाभरात वॅगन आर कार घ्यायची आहे. पेट्रोल किंवा पेट्रोल व सीएनजी यापकी कोणते व्हर्जन चांगले ठरेल. वॅगन आरचा परफॉर्मन्स कसा आहे. – योगेश पारखी
– नवीन वॅगन आरचा परफॉर्मन्स उत्तम आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा पॉवर कमी असली तरी तिचा मायलेज प्रतिलिटर १९ किमी एवढा आहे. तुम्ही मुंबई-ठाणे परिसरात राहात असाल आणि तुमचे मासिक ड्रायिव्हग ७०० किमी असेल तर सीएनजी व्हर्जन घ्या. मात्र, तुम्ही मुंबईबाहेर राहात असाल आणि ७०० किमीपेक्षा कमी ड्रायिव्हग असेल तर पेट्रोल व्हर्जनला प्राधान्य द्या. कारण ती जास्त काळ टिकते आणि तिचा मायलेजही चांगला आहे.

5. मी उजव्या पायाने अपंग आहे. मला चालवता येऊ शकेल अशी कोणती गाडी आहे का, असल्यास कोणती, तिची किंमत काय आहे. माझे बजेट फक्त तीन लाख रुपये आहे. – विनोद देशमुख, नांदेड<br />– जुनी आय१० ऑटो तुम्हाला नक्की दोन-तीन लाखांत प्राप्त होऊ शकेल. तिला तुम्ही अ‍ॅक्सिलरेटर डाव्या बाजूला शिफ्ट करून घेतलात तर गाडी सामान्य माणसाप्रमाणे तुम्हाला चालवता येऊ शकेल.

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.