दुचाकींच्या बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत कसा बदल होत गेला हे पाहणे मनोरंजक तर ठरेलच शिवाय थोडी इतिहासाची उजळणीही होईल. एकेकाळी फॅमिली बाइक म्हणून स्कूटरला सर्वप्रथम मान होता. मोटरसायकलपेक्षा स्कूटरच अधिक सोयीची मानली जायची. मात्र आता स्कूटर रस्त्यावर शोधावी लागते..

गरिबाची दुचाकी आणि श्रीमंतांची चारचाकी अशी समजूत निदान भारतात तरी गेले कित्येक वष्रे पहायला मिळते. गाडय़ांवरून आणि गाडय़ांच्या मालकीवरून माणसांचे स्टेटस समाजात आपसूकच ठरवण्यात येते. या सर्व पाश्र्वभूमीवर काही संकल्पना मात्र अत्यंत वेगाने बदलत आहेत. गरिबाची दुचाकी आणि श्रीमंताची चारचाकी ही संकल्पनाही आजच्या काळात कितपत खरी ठरेल हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षांत दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत. चांगले मायलेज असो, वापरण्यातील सोयीसुविधा असोत वा श्रीमंतीचा देखावा, या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या बाइक्स आज सर्वत्र उपलब्ध आहेत. लोकही बाइक्सकडे केवळ एक गरज, उपयोगाची वस्तू म्हणून न बघता स्वतची ओळख प्रस्थापित करण्याचे एक माध्यम, आपल्या व्यक्तिमत्वाचा, समाजातील स्थानाचा एक भाग म्हणून पाहतात. कधीकाळी पसे वाचवून एक दुचाकी घ्यायची आणि तीच आयुष्यभर धोपटायची अशी प्रथा होती. मात्र, आताशा परिस्थिती बदलू लागली आहे. अगदी दहावीपासूनच गाडय़ांची मागणी होऊ लागते. मग कॉलेजात जायला लागलेल्या पोराटोरांकडे अ‍ॅक्टिव्हा, अंडरग्रज्युएट असताना यामाहा किंवा होंडा आणि मग नोकरीत स्थिरस्थावर झालो की मग कार व हौसेमौजेखातर रॉयल एनफिल्ड असा ट्रेण्ड पडू लागला आहे. त्यात मध्यमवर्गीयांचीच संख्या जास्त आहे.
या सर्व पाश्र्वभूमीवर दुचाकींच्या बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत कसा बदल होत गेला हे पाहणे मनोरंजक तर ठरेलच शिवाय थोडी इतिहासाची उजळणीही होईल. एकेकाळी फॅमिली बाइक म्हणून स्कूटरला सर्वप्रथम मान होता. मोटरसायकलपेक्षा स्कूटरच अधिक सोयीची मानली जायची. काळाचा ओघ मात्र एवढा तगडा की आता स्कूटर रस्त्यावर शोधावी लागते. हमारा बजाजच्या जाहिराती आता यू टय़ूबवर पाहून जुन्या काळाचा फील घेता येतो. स्कूटरनंतर सर्वप्रथम बाजारात टू स्ट्रोक बाइक्स दाखल झाल्या. फोर स्ट्रोक गाडय़ांची निर्मिती सुरू होताच टू स्ट्रोक गाडय़ा हद्दपार झाल्यात. फोर स्ट्रोक गाडय़ा वापरून इंधनाचा खर्च कमी होतो हे लक्षात येताच सर्वत्र त्याची मागणी वाढली. याच काळात कॉलेजगोइंग तरुणांना लक्ष्य करून वेगवान बाइक्स बाजारात आणण्याचा ट्रेण्ड सुरू झाला.मायलेजचा विचार न करता केवळ हौस आणि दिखावा म्हणून दुचाकींचा वापर करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढू लागली. या सर्वाचा एकत्रित परीणाम असा झाला की सर्व प्रकारच्या दुचाकी गाडय़ा आज आज बाजारात उपलब्ध आहत.
मुक्त बाजारपेठ
एकेकाळी दुचाकी निर्मिती ही काही मोजक्या कंपन्यांचीच मक्तेदारी होती. मात्र, आज दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची संख्या फोफावते आहे. कित्येक परकीय दुचाकी निर्माते भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. दुचाकी वापरणारयांमध्ये प्रामुख्याने दोन वर्ग पडतात. एक वर्ग अशा लोकांचा ज्यांना अधिकाधिक कार्यक्षम इंजिन, चांगले मायलेज हवे आहे आणि दुसरा वर्ग अशा लोकांचा ज्यांना वेगवान इंजिन हवे आहे. साहजिकच अधिक वेगवान गाडीचे मायलेज कमी असते; परंतु आता सर्व कंपन्यांमध्ये चढाओढ ही अधिकाधिक वेगवान परंतु तितक्याच कार्यक्षम आणि अधिक मायलेज देणारया गाडय़ांची निर्मिती करण्याकरिता आहे. यामाहा, व्हेस्पा व इतर काही कंपन्या या नवनवीन तंत्रज्ञान शोधून आणि त्याचा वापर करून उत्तमोत्तम वाहन निर्मिती करतांना आज दिसतात.
 दुचाकी वाहन निर्मितीतील वाढती मागणी लक्षात घेऊन मिहद्रा, ळश्र इत्यादी भारतीय कंपन्या चांगल्याच सरसावल्या असून त्यांनी बाजारपेठेत चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ही स्पर्धा भारतीय निर्मात्यांपुरतीच मर्यादित नसून होंडा, सुझुकी, यामाहा, व्हेस्पा इत्यादी परकीय कंपन्याही त्यांच्या नवनवीन व दर्जेदार उत्पादनांसह बाजारात उतरल्या आहेत. भारतात सुपर बाइक्सलाही प्रचंड मागणी आहे. केवळ सिनेमाच्या पडद्यावर दिसणाऱ्या हर्ली डेव्हिडसन, होंडा सीबीआर यांसारख्या सुपरबाइक्स आज सर्रास रस्त्यांवरून धावताना दिसतात. ङळट आणि ह्य़ोसंग सारख्या कंपन्या ज्या फक्त उच्च क्षमतेच्या आणि महागडय़ा दुचाकींची निर्मिती करतात, त्यांची दालने भारतातल्या मोठय़ा शहरांमध्ये दिसून येतात आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. एकेकाळी अवजड समजली जाणारी रॉयल एन्फिल्ड विकत घेण्याकरिताही हल्ली तीन ते चार महिने वेटिंग असते.

पर्यावरणस्नेही बाइक्सही स्पर्धेत  
 या सर्व जड, कमी मायलेज देणाऱ्या गाडय़ांना आपले पर्यावरण कितपत सांभाळू शकेल हा चिंतेचा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात चांगली बाजू ही की कित्येक दुचाकी निर्माते विजेवर चालणारया वाहनांची निर्मिती करीत आहेत. या इलेक्ट्रिक बाइक्स पर्यावरणस्न्ोही असून वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मुक्त आहेत. लोकांचा वाढता प्रतिसाद या वाहनांच्या निर्मितीला पूरक आहे. शहरांमध्ये कमी क्षमतेच्या गाडय़ांचा वापर करणे हे कायमच अधिक सोयीचे, सुरक्षित आणि खिशाला परवडणारे आहे. हिरो, मिहद्रा, सुझुकी इत्यादी प्रथितयश दुचाकी निर्माते त्यांचा भरपूर वेळ, पसा आणि मनुष्यबळ इलेक्ट्रिक बाइक्स निर्मितीवर खर्च होत आहेत. विद्युत दुचाकींच्या निर्मितीबरोबरच पारंपारिक तंत्रज्ञानात बदल करून इंजिनाची गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्नही जोरात सुरू आहेत. यामाहा देखील इंजिन मध्ये काही मुलभूत बदल करून वेगवान आणि तितक्याच कमी इंधनाचा वापर करणाऱ्या दुचाकींची निर्मिती करण्याचा प्रयत्न करते आहे. व्हेस्पाने भारतीय बाजापेठेत दाखल केलेली नवीन दुचाकी म्हणजे मायलेज, गुणवत्ता आणि देखणेपणा यांचा मिलाफ आहे.
 काही महिन्यांपूर्वीच प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांनी दुचाकींच्या बाजारात एखाद्या कंपनीने दीर्घकाळ टिकून राहणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. रोज प्रगत होत जाणारे तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदलत्या आवडी आणि नवनवीन निर्मात्यांचा शिरकाव यामुळे दुचाकींचे विश्व हे फारच वेगाने बदलत असल्याचे एका मुला्नखतीत स्पष्ट केले होते. गेल्या दहा वर्षांत बाजारात दाखल झालेल्या आणि ग्राहकांच्या पसंतीस न पडल्यामुळे हद्दपार झालेल्या गाडय़ांची जर आपण संख्या पहिली तर राहुल बजाज यांच्या वक्तव्याची सत्यता लगेच दिसून येईल. येत्या वर्षभरात कित्येक निर्माते त्यांच्या नानाविध नवीन उत्पादनांसह या सर्व स्पध्रेला तोंड देण्यास उतरत आहेत. या सर्व वाहनांच्या, त्यांत वापरल्या गेलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा, झपाटय़ाने होणाऱ्या बदलांचा वेध घेणे खरच मनोरंजक ठरेल.
(क्रमश:)