वाहन चालवण्याचे नियम

मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम …

मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम आहेत.
१) यामध्ये नियमाचे नाव आणि नियम दिनांक १ जुल १९८९ पासून लागू करण्यात आले आहेत असे म्हटले.
२) डाव्या बाजूने चालावे.
३) अ) डावीकडे वळताना वाहन रस्त्याच्या जास्तीत जास्त डावीकडे नेत नेत मग वळण घ्यावे.
ब) उजवीकडे वळताना वाहन आधी रस्त्याच्या जास्तीत जास्त मध्ये आणि ज्या रस्त्यावर आपण प्रवेश करणार आहोत त्या रस्त्याच्या जास्तीत जास्त डाव्या बाजूने प्रवेश करावा.
४) एकाच दिशेने प्रवास करताना वाहतुकीच्या उजव्या बाजूने निघण्याचा प्रयत्न असावा.
५) एखाद्या वाहनाने उजवीकडे शिरण्याचा संकेत दिला असताना आणि त्यासाठी त्याने वाहन रस्त्याच्या जास्तीत जास्त मध्ये आणलेले असताना आपले वाहन डाव्या बाजूकडे घ्यावे. मात्र असे करताना इतर रोड वापरणाऱ्यांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
६) ओव्हरटेकिंग केव्हा करू नये: खालील परिस्थिती असताना ओव्हरटेकिंग करू नये.
अ) जर सदर ओव्हरटेकिंगमुळे कोणत्याही दिशेने असलेल्या वाहतुकीला अडथळा येणार असेल.
ब) जर वाहन अशा जागेवर असेल जेथून पुढचा रस्ता दिसतच नसेल, जसे वळण, उंचवटा, कोपरा, तात्पुरता इतर अडथळा इत्यादी.
क) जर आपल्या लक्षात आले असेल की, आपल्या मागच्या वाहनाने ओव्हरटेकिंग करायला सुरुवात केली आहे.
ड) जर आपल्या पुढे असलेल्या वाहनाच्या चालकाने पुढे काढण्याचा संकेत दिलेला नाही आहे.
७) कोणत्याही वाहनाच्या चालकाने जर त्याच्या वाहनाला इतर कोणतेही वाहन ओव्हरटेकिंग करीत असेल तर त्या वाहनाला स्वत:च्या ताब्यातील वाहनाचा वेग वाढवून ओव्हरटेकिंग करण्याला अडथळा करू नये.
Ferari, car, drive,
फेरारी एफ१२ जीटीओ
फेरारी निर्माते सध्या एफ१२ या नव्या व्हर्जनवर काम करत असून नव्या गाडीचे नाव एफ१२ जीटीओ असे असेल, असे समजते. २५० जीटीओ या गाडीचेच सुधारित रूप नव्या फेरारीचे असेल. एफ१२ जीटीओची निर्मिती अगदी मर्यादित असेल. केवळ ६५० गाडय़ाच फेरारी तयार करणार असून येत्या सप्टेंबरमध्ये फ्रँकफर्ट येथे होणाऱ्या मोटार शोमध्ये ही गाडी सादर केली जाणार असल्याचे समजते. मात्र, असे असले तरीही फेरारी पुढील महिन्यापासून जीटीओचे ऑनलाइन दर्शन घडवू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Driving rules

Next Story
लायसेन्सबद्दल काही प्रश्न
फोटो गॅलरी