मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम आहेत. त्यापकी नियम क्रमांक १९ व २० खाली देण्यात येत  आहेत.

१९) रस्त्याच्या पृष्ठभागावरील थांबा रेषा- ९ एखाद्या रस्त्याच्या पृष्ठभागावर रोड जंक्शन किंवा पादचारी क्रॉसिंगच्या आधी एक रेखा आखणी केलेली असेल अशा ठिकाणी कोणत्याही चालकाने जेव्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने हाताने किंवा वाहतूक सिग्नलच्या मदतीने थांबण्याचा इशारा केलेला असेल तेव्हा त्या चालकाने त्याच्या वाहनाचा कोणताही भाग त्या रेषेच्या पुढे जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

९ या नियमामध्ये वर्णन केलेली रेषा ५० मिलिमीटरपेक्षा कमी रुंदीची नसावी, तसेच सदर रेषेचा रंग पांढरा, काळा किंवा पिवळा असावा.

२०) टोविगबद्दल नियम

९ यांत्रिकदृष्टय़ा निकामी झालेले वाहन किंवा अपूर्ण काम झालेले वाहन, नोंदणी झालेले ट्रेलर किंवा एखाद्या वाहनाला जोडलेली साइड कार या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणतेही वाहन टोिव्हग करून नेण्यात येऊ नये, परंतु एखादे वाहन वितरित करायचे असेल किंवा जवळच्या इंधनपुरवठा पंपावर किंवा गॅरेजमध्ये नेण्यासाठी मात्र वाहन टोिव्हग करता येईल.

९ जर एखादे वाहन टोिव्हग करून न्यायचे असेल आणि ज्या वाहनाची २३ी१्रल्लॠ शी संलग्न चाके रस्त्याच्या पृष्ठभागावरून जाणार असतील अशा वाहनाच्या स्टीिरग सीटवर विधिग्राहय़ लायसेन्स असलेली व्यक्ती असणे अनिवार्य आहे, परंतु जर या वाहनाची २३ी१्रल्लॠ शी संलग्न चाके जमिनीपासून काही उंचीवर सुरक्षितपणे जखडलेली असतील, तर आणि सदर वाहन क्रेन किंवा तत्सम यंत्राच्या साहय़ाने ओढून नेले जात असेल तर त्याला मान्यता आहे.

९ जर एखादे वाहन दुसऱ्या वाहनाकडून ओढून नेले जात असेल, तर त्या दोन वाहनांमधील अंतर पाच मीटरपेक्षा जास्त नसावे, सदर वाहनामधील दोर किंवा चेन इतर वाहनचालकांच्या आणि रस्त्यावरील व्यक्तींच्या लक्षात येईल असे पाहिजे, तसेच वाहनाच्या ओढल्या जाणाऱ्या वाहनाच्या मागच्या बाजूला कमीत कमी ७५ मीमी उंचीच्या अक्षरात पांढऱ्या पाश्र्वभूमीवर काळ्या रंगाने “डठ ळडह” असे लिहिलेले असावे.

९ जर एखादे वाहन दुसऱ्या वाहनाकडून ओढून नेले जात असेल, तर त्या वाहनांचा वेग दर ताशी २५ किमीपेक्षा जास्त असू नये.     क्रमश: