गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अनेकांनी नव्या वर्षांत गाडी घेण्याचा संकल्प केला असेल. त्यापकी अनेकांचा हा संकल्प तडीलाही गेला असणार, यात शंकाच नाही; पण असेही काही जण असतील की, त्यांना विविध अडचणींमुळे यंदा आपल्या दारासमोर नवी कोरी गाडी उभी करता आली नसेल. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात गाडय़ांच्या किमती वाढल्याने आपल्या आवडत्या गाडीचं आवडतं मॉडेल महाग झालं, अचानक घराची दुरुस्ती समोर आली, घरात एखादं कार्य निघालं.. एक ना अनेक अडचणींमुळे गाडी घेण्याचा बेत पुढे ढकलावा लागला असेल, तर त्याबद्दल खंत मानून घेऊ नका. कारण नव्या वर्षांत ऑटोमोबाइल कंपन्या आपली नवीन मॉडेल्स भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेत उतरवत आहेत. ही मॉडेल्स आकर्षक आहेत, यात शंकाच नाही; पण बदलत्या टेक्नॉलॉजीच्या युगात ती अद्ययावतही असतील. त्यामुळे यंदाच्या वर्षांत जे निसटले, ते दामदुपटीने पुढील वर्षांत मिळण्याची शक्यता आहे. या गाडय़ांमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गाडय़ांबरोबरच २५-३०-५० लाखांच्या गाडय़ांचाही समावेश आहे; पण तूर्तास आपण अशा महागडय़ा गाडय़ांकडे पाहण्यापेक्षा आपल्या खिशाकडे नजर टाकून परवडणाऱ्या नव्या गाडय़ांकडे पाहू या. अशा काही गाडय़ांपकी काही निवडक गाडय़ांची माहिती तुमच्यासाठी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा झिका
नवीन वर्ष टाटा मोटर्ससाठी खूपच आशादायक आहे. या वर्षांत टाटाच्या अनेक महत्त्वाकांक्षी गाडय़ा बाजारपेठेत येत आहेत. त्यापकीच एक म्हणजे टाटा झिका! टाटा इंडिका गाडीने टाटा मोटर्सला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील आणि मायलेजच्या दृष्टीनेही सोयीची म्हणून इंडिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. याच गाडीच्या धर्तीवर टाटाने झिका ही गाडी बाजारात आणण्याचे ठरवले आहे. हॅचबॅक श्रेणीतील ही गाडी लुक्सच्या बाबतीत इंडिकाच्या जवळ जाणारी असली, तरी ती पाहताना शेव्हरोले स्पार्कची आठवण आल्याखेरीज राहत नाही. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन इंजिन्समध्ये उपलब्ध आहे. ११९९ सीसी पेट्रोल इंजिन आणि १०४७ सीसी डिझेल इंजिनमुळे गाडी दणकट असणार, यात शंकाच नाही. गाडी अद्ययावत आणि उच्च श्रेणीतील दिसावी, यासाठी गाडीचा आकार, काही कव्‍‌र्हज खूपच छान पद्धतीने डिझाइन केले आहेत. इंडिका ही गाडी चांगल्या आणि आरामदायक केबिन स्पेससाठी ओळखली जाते. नवीन झिका ही गाडी इंडिकाच्याच धर्तीवर असल्याने या गाडीची केबिन स्पेस किमान इंडिकाइतकी असेल, यात शंका नाही. या गाडीची किंमत ३.९५ लाख ते ५.५० लाख या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही गाडी २०१६ च्या पहिल्या तिमाहीतच बाजारात येईल.

More Stories onकारCar
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New car launches in
First published on: 25-12-2015 at 04:17 IST