चाय-पकोडा रन

वर्षअखेर म्हणजे काíनवल.. ख्रिसमसपासून ते नववर्षदिनापर्यंत मौज, मजा, मस्ती असं सारं वातावरण असतं.. आणि याचं खास आकर्षण अर्थातच गोवा..

वर्षअखेर म्हणजे काíनवल.. ख्रिसमसपासून ते नववर्षदिनापर्यंत मौज, मजा, मस्ती असं सारं वातावरण असतं.. आणि याचं खास आकर्षण अर्थातच गोवा.. तर या गोव्यात पुढील वर्षी म्हणजे १७-१८ जानेवारीला बाइक सप्ताह होणार आहे. या सप्ताहासाठी आतापासूनच सुरुवात झाली आहे. देशभरातील २० शहरांमध्ये त्यानिमित्ताने चाय-पकोडा रनचे आयोजन करण्यात आले. राज्यात पुणे, मुंबई व नगर या ठिकाणी या रन आयोजित करण्यात आल्या. २४ नोव्हेंबरपासून या रनला सुरुवात झाली आहे. १६० किमी अंतर कापायचं आणि एका ठरावीक अंतरावर चहा-नाश्त्यासाठी थांबायचे असे या रनचे स्वरुप आहे. बाइकची आवड असलेल्या सर्वासाठी ही स्पर्धा खुली आहे.
या रनमधून निवडलेल्या बायकर्सना गोव्यात होणाऱ्या इंडिया बाइक वीकमध्ये सहभागी होता येणार आहे. इंडिया बाइक वीकचे हे दुसरे वर्ष. बायकिंगबाबत जनजागृती व्हावी, सुरक्षित रायिडगसंदर्भात लोकांमध्ये जागरुकता यावी तसेच या निमित्ताने सर्वानी खास करून तरुणांनी एकत्रित यावे यासाठी या बाइक वीकचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी १२ आणि १३ फेब्रुवारीला गोव्यात हा बाइक वीक आयोजित करण्यात आला होता. त्याला हजारो तरुणांनी प्रतिसाद दिला होता. यंदाही किमान १२ हजार रायडर्स गोव्यात दाखल होतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tea pakoda run

ताज्या बातम्या