कोणती कार घेऊ?

माझे बजेट सहा लाख रुपये आहे. मला एबीएस, एअर बॅग्ज, अलॉय व्हील्स, पॉवर विण्डोज, पॉवर स्टीअिरग आदी सुविधा असलेली कार घ्यायची आहे.

*माझे बजेट सहा लाख रुपये आहे. मला एबीएस, एअर बॅग्ज, अलॉय व्हील्स, पॉवर विण्डोज, पॉवर स्टीअिरग आदी सुविधा असलेली कार घ्यायची आहे. झेस्ट, ग्रँड आय१० , इटिऑस लिवा, बीट, ब्रिओ, बोल्ट, पोलो, फिगो, रिट्झ यापकी कोणत्या गाडीची निवड करू.  
– मोहन शानभाग

*पेट्रोलवर चालणारी आणि चांगला मायलेज देणारी सहा लाखांतील चांगली गाडी म्हणजे होंडा ब्रिओ व्हीएक्स. हिचा मायलेज २० किमी प्रतिलिटर आहे. परंतु तुम्हाला आणखी प्रशस्त गाडी हवी असेल तर रिट्झ झेडएक्सआय ही चांगली गाडी आहे. तुम्ही तुमचे बजेट सात लाखांपर्यंत वाढवले तर पोलो ही सर्वाधिक सोयिस्कर ठरेल. स्कोडा फाबिया या किमतीत मिळाली तर उत्तमच.
*मी विद्यार्थी आहे. माझ्या घरच्यांना फॅमिली कार घ्यायची आहे. पेट्रोलवर चालणारी गाडी जास्त पसंतीची आहे. मात्र, आमचा प्रवास फारसा नसतो. आय २० एलिट, अ‍ॅक्टिव्ह आणि स्विफ्ट हॅचबॅक यापकी कोणती गाडी अधिक सरस ठरेल.
– अभिजित लांडगे

*आय २० एलिट ही अ‍ॅक्टिव्ह स्विफ्टपेक्षा एक लाखानी महाग आहे. पण जर तुम्ही गाडी जास्त वापरत नसाल तर तितक्याच किमतीतील आणि मेन्टेनन्सच्या दृष्टीने योग्य असलेली गाडी म्हणजे स्विफ्ट होय. तिचे मायलेज उत्तम आहे आणि रिसेल व्हॅल्यूही तिला चांगली आहे.
*सर २००२ सालची टाटा सुमो ए१ बघितली आहे. कृपया किती रुपयेपर्यंत घ्यावी मार्गदर्शन करावे.
– सागर सूर्यवंशी

’माझ्या मते २००२ची टाटा सुमो न घेणेच योग्य. कारण तिचे इंजिन फार काही चांगले नव्हते. मेन्टेनन्सही जास्त आहे. आणि १५ वर्षांनंतर ग्रीन टॅक्स भरावा लागेल. जुनी गाडी घ्यायचीच असेल तर टोयोटा क्वलिस घ्या, ती तुम्हाला दोन ते साडेतीन लाखांपर्यंत मिळू शकेल.
’सर, माझा पगार २० हजार रुपये आहे. मला एखादी कमी मेन्टनन्सवाली चारचाकी गाडी घेणे परवडू शकते का, माझा रोजचा प्रवास २२ किमी आहे. तसेच माझी उंचीही चार फूट ११ इंच आहे. कोणती गाडी घेणे जास्त सोयिस्कर ठरू शकेल.
– लीना पेडणेकर.

*दरमहा सहा हजार रुपये खर्च करायची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच कार घेऊ शकता. काहीच अडचण नाही. तुम्ही ७० टक्के पसे दिलेत तर नवी कोरी नॅनो सीएक्स किंवा सेकंड हँड अल्टो के १० या गाडय़ा तुम्हाला घेता येऊ शकतील. तसेच वॅगन आरही तुम्ही घेऊ शकाल.
’माझ्याकडे ग्रँड आय१० स्पोर्ट्स सीआरडीआय गाडी आहे. ही गाडी मी २०१३ मध्ये विकत घेतली. माझ्या गाडीचे रनिंग कमी आहे. आठवडय़ातील दोन-तीन दिवस तर गाडी दारातच उभी असते. अशा परिस्थितीत गाडीचे इंजिन अधिकाधिक कार्यक्षम राहावे यासाठी काय काळजी घेतली जावी. गाडी साधारणत किती किमी चालवली पाहिजे किंवा किती दिवस गाडी बंद असली तरी चालते. कृपया सांगा.
– प्रशांत आघाव, शेगाव

*आजकालच्या डिझेल गाडय़ांना मेन्टेनन्स कमीच असतो. त्यामुळे सहा-सात दिवस गाडी बंद ठेवली तरी काही हरकत नसते. परंतु सहा-सात दिवसांनी तरी किमान ५० किमीपर्यंत गाडी चालवली गेली पाहिजे. बॅटरीतील पाणी वगैरे नियमित तपासून घ्या. गाडी नुसती रोज चालू केली तरी ती चांगली राहते. पावसाळ्यात मात्र अधिक काळजी घ्यावी. कारण पावसात गाडी सात-आठ दिवस उभी राहिली तर इंजिनात फंगस निर्माण होण्याची शक्यता बळावते. हे टाळायचे असेल तर पावसाळ्यात किमान दहा मिनिटे तरी सुरू करून ठेवावी.

या सदरासाठी तुमचे प्रश्न  ls.driveit@gmail.com वर पाठवा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Which car should be purchased