18 March 2018

News Flash

अशिक्षित मंत्र्यांचे मंडळ

लालूप्रसादांच्या तेजस्वी या चिरंजीवास थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवताना नीतिशकुमारांची कोण त्रेधा उडाली असेल

Updated: November 22, 2015 6:46 PM

राजकारण आणि शिक्षणाचा काय संबंध हा भारताच्या स्वातंत्र्यापासून विचारला जाणारा प्रश्न आणखी किती काळ विचारावा लागेल, याचे उत्तर मिळणे मात्र कठीण आहे.

बिहारच्या मंत्रिमंडळातील अशिक्षितांची संख्या पाहता, मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्यापुढे भविष्यात काय काय वाढून ठेवले आहे, ते लक्षात येईल. सार्वजनिक जीवनाचा आणि राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या आणि नववी उत्तीर्ण झालेल्या लालूप्रसादांच्या, तेजस्वी नामक चिरंजीवास थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवताना, या नीतिशकुमारांची कोण त्रेधा उडाली असेल! लालूंची साथ घेताना, त्यांचा पक्ष अधिक जागा मिळवेल, असे न वाटल्याने आणि आता त्यांच्या तालावर नाचण्यावाचून पर्याय नसल्याने अट्ठावीसजणांच्या मंत्रिमंडळात किमान दहा मंत्र्यांनी शालान्त परीक्षाही दिलेली नाही. अशा अशिक्षितांना बरोबर घेऊन राज्य करायचे, तर निर्णय घेताना केवढा गोंधळ होईल, ते फक्त नीतिशकुमारच जाणोत. सिंगापूरसारख्या देशात मंत्रीपदासाठी अशी किमान शिक्षणाची अट आहे. भारतात तशी अट ठेवायची झाली, तर अनेकांना राजकारणच सोडून द्यावे लागेल.
परंतु येथे राजकारणातील घराणी अधिक प्रभावशाली असतात आणि तेथे जन्मापासूनच राजकारणाचे धडे शिकवण्याची व्यवस्था असते. लालूंच्या घरात जन्मलेल्या पहिल्या मुलीने म्हणजे मिसाने थेट एमबीबीएस पदवी मिळवून डॉक्टरकी करण्याची तयारी केली. तरीही तिला यावेळी डावलण्यात आल्याने कुटुंब कलह निर्माण झाला. तिच्या फुरंगटण्याने अखेर नीतिशकुमारांनाच मध्यस्थी करून तेजस्वी यास हिरवा कंदील दाखवावा लागला. यादव कुलोत्पन्नांपैकी दोघांना या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. स्वत: अभियंता असलेल्या मुख्यमंत्र्यांना तिसऱ्यांदा हे पद स्वीकारताना, भविष्यातील या सगळ्या अडचणींचा डोंगर दिसतच असेल. त्यामुळेच अशिक्षित मंत्र्यांना सारासार निर्णय घेऊन तो राबवणे आणि जनहिताचा विचार करणे कितपत शक्य होईल, अशी शंका स्वाभाविकपणे उपस्थित होऊ लागली आहे. राजकारण आणि शिक्षणाचा काय संबंध हा भारताच्या स्वातंत्र्यापासून विचारला जाणारा प्रश्न आणखी किती काळ विचारावा लागेल, याचे उत्तर मिळणे मात्र कठीण आहे.

First Published on November 22, 2015 6:46 pm

Web Title: lalus only 9 th pass son tejaswi yadav appointed deputy chief minister of bihar
 1. M
  makarand
  Nov 23, 2015 at 11:31 am
  कोणत्या जगात राहता तुम्ही
  Reply
  1. M
   Mangesh
   Nov 22, 2015 at 8:39 pm
   यह तो सिर्फ झांकी है, असली खेल तो अभी बाकी ही..... नितीशकुमार करा आता किती कामे करायची ती. सुरुवातीलाच एवढा मोठा झटका तर यापुढे लालू तुम्हाला कसा नाचायला लावतो ते पहाच. असंगाशी संग......आणखी काय बोलायचे.....
   Reply
   1. M
    mukund Kanitkar
    Nov 23, 2015 at 11:38 am
    हे असेच जर चालणार असेल तर काय म्हणायचे. अश्या मंत्र्यांना विषय समजणार तरी कसे अन त्याची सोदौणूक होणार तरी कशी.हि लोकशाहीची चेस्त्ताच नाही का ? या वर माननीय मुख्य मंत्री श्री. नितेश्कुमारजी कसा मार्ग काढतात ते पाहणे उत्शुक्तेचे ठरेल.एकंदर माा कठीण दिसत आहे.याचे उत्तर कालच देईल.तो पर्यंत नितीश्जीना आणि बिहार्कारांना शुभेच्या.
    Reply
    1. D
     DR MURLIDHAR
     Nov 22, 2015 at 4:53 pm
     बिहार हा अशा बुद्धिमान हुशार लोकांचा प्रदेश आहे हे ह्या वरून सिद्ध होते
     Reply
     1. Prakash Lonkar
      Nov 23, 2015 at 4:17 am
      बिहार निवडणुकीच्या निकालाचे पोस्ट मोरटेम करताना आपल्याकडील राज/पत्र/समाज पंडितांनी बिहारच्या जनतेचे खूपच कौतुक केले होते,भारतीय राजकारणाला नवीन दिशा मिळण्याची पण भविष्य वाणी पण केली गेली.आपल्याकडील जनता अजून जात/पात/धर्म/भाषे पलीकडे जाऊन मतदान करत नाही हे वास्तव ह्या सर्व पंडितांनी बुद्धिपुरस्सर लपवून ठेवण्यात धन्यता मानली.येत्या ा महिन्यात बिहारचे राजकारण काय वळण घेयील ते बघा.एक वेळ अशी येयील कि लालुमुळे नितीशला पुन्हा बी.जे.पी.शी हातमिळवणी करावी लागेल.तेथे स्थिर सरकार कठीण आहे.
      Reply
      1. R
       rajendra
       Nov 23, 2015 at 3:02 am
       जय हो बाबू बिहारी लालू को जीताके खुद तो हारी ! और घरवापसी जंगलराज कि बारी !!
       Reply
       1. Sudhir Karangutkar
        Nov 22, 2015 at 4:30 pm
        लालू रबडी नितीशकुमारांची अशीच हलत करून ठेवणार आहे म्हणजे घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी अवस्था नितीशची झाली असणार आणि लालू आणि त्यांचे पुत्र बिहारात पुन्हा जंगल राज निर्माण करणार व अजून एक मोठा घोटाळा करणार त्याला नितिश काहीही अडवू शकणार नाही मूर्ख बिहारी जनतेला याचे काहीही सोयरसुतक नाही
        Reply
        1. S
         Shriram
         Nov 23, 2015 at 5:20 pm
         आय ए एस अधिकारी विचारतील "तीन हिस्से, एक आपका, एक मेरा और एक लालुजीका" हे लगेच मान डोलावतील.
         Reply
         1. S
          Shriram
          Nov 23, 2015 at 4:32 am
          बिहारमधले अशिक्षित ही काय चीज आहे याची कल्पना नाही, पण कुमार केतकर अलीकडील एका चर्चेत स्मृती इराणी यांच्यावर शिक्षणावरून तिरकस शेरेबाजी करत होते. माझे आव्हान आहे की इतक्या वर्षांच्या मानल्या गेलेल्या पत्रकारीतेनंतरही केतकर यांनी शिक्षणव्यवस्था हा विषय ठेवून स्मृती इराणी यांच्याशी सर्वाना समजण्यासाठी इंग्रजीमध्ये जाहीर चर्चा करावी मग फे फे कोणाची उडते हे समोर येईल.आणि अशीच चर्चा मराठीत कॉंग्रेसचे सावंत आणि राष्ट्रवादीचे लोंढे यांनी विनोद तावडे यांच्याबरोबर करावी. दुधका दुध पानिका पानी हो जायेगा
          Reply
          1. S
           Sudhir Mhetre
           Nov 22, 2015 at 4:46 pm
           बिहार मंत्री मंडळ बद्दल लोकसत्ताच्या संपादकांचे मत जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. भाजपचा पराभव झ्हाल्यानंतर ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या ते आता काय मत प्रदर्शन करणार हे पाहायला मजा येईल.
           Reply
           1. S
            sanjay
            Nov 23, 2015 at 7:07 am
            त्याग आणि माणुसकीचे यापेक्षा मोठे उदाहरण कोणते असू शकते? लालूच्या नववी नापास मुलाचे राजकीय भवितव्य घडविण्या साठी बिहारच्या जनतेने आपल्या स्वतःच्या मुलांचे भवितव्य अंधारात लोटले. जशी जनता तसेच प्रतिनिधी. या लोकांसाठी वाईट अजिबात वाटून घ्यायचे नाही. आता जास्त लोंढे महाराष्ट्रात येतील.
            Reply
            1. S
             subhash uttarwar
             Nov 23, 2015 at 10:10 am
             आधीच मर्कट त्यात मद्य प्याला .आधीच लालू बाहेर जामिनावर आहेत त्यात आता बिहारचे रिमोट त्यांचे हातात .बिहारच्या निवडणुकीने लोकशाही खर्या अर्थाने धोक्यात आणली आहे .सत्तेसाठी नितीश सुद्धा किती लाचार आहेत ते दिसून आले .अन्यथा लालूच्या दोन्ही मुलांना मंत्रिपद नाकारले असते .पहा पुढे पुढे काय नाटक घडते ?
             Reply
             1. S
              subhash uttarwar
              Nov 22, 2015 at 5:57 pm
              नितीश कुमार सुद्धा एक लाचार मुख्य मंत्री होतील .लालूच्य भ्रष्ट राजवटी विरुद्ध लढून सत्तेत आलेले कुमार पुन्हा लालूला शरण गेले .आता सत्ता हवी तर लालूचे गणगोत सांभाळावे लागेलच .भाजपशी संबध तोडताना नितीशला तत्व ज्ञान आठवत होते ,आणि सत्ते साठी सारे गुंडाळून ठेवले .
              Reply
              1. V
               vasant
               Nov 23, 2015 at 12:03 am
               महाराष्ट्र या बाबतीत पुढे आहे आमचा मुख्य मंत्रीच अशिक्षित होता मग बिहारला का हसता उद्या भारताचा प्रधान हा अशिक्षित असेल अशी आशा करू या
               Reply
               1. V
                veeresh
                Nov 23, 2015 at 4:08 am
                किमान शिक्षणाची अट असायलाच हवी. नाहीतर सर्व राज्यांचा "बिहार" होण्यास वेळ लागणार नाही.
                Reply
                1. Load More Comments