News Flash

पिंपळपानावरचा प्रेमयात्री

पाडगावकरांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील आनंदयात्री आज नाहीसा झाला.

दोस्ताना जमवावा, हास्यिवनेाद आणि काव्यानंदात दोन घटका मजेत घालवाव्यात असा त्यांचा स्वभाव. त्यांचे मेाठेपण हे की ते तसेच जगले. कोणताही आव आणला नाही.

मराठी भाषेस प्रेमाचे तसे वावडेच. सारा भर अव्यक्तावरच. मग ते प्रेम प्रिययकर प्रेयसीचे यांतील असो वा अन्य कोणत्या नात्याचे. ते फक्त ज्याने त्याने समजून घ्यावयाचे. या प्रेमास मोकळेपणाने व्यक्त करण्याची चव अलिकडच्या काळात मंगेश पाडगावकर यांनी लावली. कवितेच्या तंत्रावर असलेली प्रचंड हुकुमत आणि शब्दांची मंत्रमेाहिनी यावर पाडगावकरांनी मराठी साहित्यिकांच्या किमान चार एक पिढ्यांना रिझवले आणि आपल्या कवितेच्या मागे यायला लावले. सुलभ, गेय आणि नादमय अशी त्यांची कविता. तिचे स्वागत झाले नसते तरच नवल. त्यामुळे जन्माला आल्यापासून पाडगावकर आणि मराठी रसिक यांचे एक अद्वैत तयार झाले. पाडगावकरांनीही या विश्वासास कधी तडा जाऊ दिला नाही. हे साहचर्य हेवा वाटावे असे होते. कवितेचे हे तंत्र पाडगावकरांनी पूणर्पणे आत्मसात केले हेाते. कसे सांगावयाचे ते ठाउक आहे आणि काय सांगावयाचे त्याचा सातत्याने शेाध सुरू आहे अशी अवस्था आली की लेखन प्रक्रिया सुलभ हेाते.
पाडगावकरांसाठी ती तशी होती. त्यामुळेच बालगीतांपासून ते कबीर, मीरेच्या काव्यानुवादापर्यंत पाडगावकर मुक्त संचार करू शकले. सांग सांग भेालानाथ, पाउस पडेल काय, असे खरे बालगीत पाडगावकर त्याचमुळे लिहू शकले आणि त्याच सहजतेने शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी हे देखील सहजतेने त्यांना सांगता आले. ही सहज आणि सरलता हे पाडगावकर यांचे मेाठे वैशिष्ट्य. त्यामुळे त्यांच्या कवितेचे गाणे झाले तरी त्यातील काव्य दुय्यम हेात नाही. याचे कितीतरी दाखले देता येतील. श्रावणात घननिळा बरसला या खळेकाकांच्या थेार संगीताने अमीट झालेल्या गाण्यातील शेवटचे कडवे पाडगावकरांच्या कवितेचे मेाठेपण नमूद करते.

पानोपानी शुभशकु नाच्या कोमल ओल्या रेषा,
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा,
अंतयार्मी सुर गवसला, नाही आज किनारा…

हे पाडगावकरांचे काव्य. ते वाचले की त्याचमुळे काव्यरसिकांना जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी… असे वाटून आनंद होतो. बोरकरांनी म्हणून ठेवल्याप्रमाणे पाडगावकर आनंदयात्री होते. दोस्ताना जमवावा, हास्यविनेाद आणि काव्यानंदात दोन घटका मजेत घालवाव्यात असा त्यांचा स्वभाव. त्यांचे मेाठेपण हे की ते तसेच जगले. कोणताही आव आणला नाही. आपण जसे आणि जितके आहोत तसेच आणि तितकेच ते समेार येत राहिले. या येथील जगण्यावर त्यांचे अमाप प्रेम हेाते. त्यामुळे इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व थरावे… अशी त्यांची इच्छा हेाती. पाडगावकर हे त्या अथार्ने आयुष्यभर त्या पिंपळपानावरती तरणारे प्रेमयात्री हेाते. त्यांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील हा कायमचा आनंदयात्री आज नाहीसा झाला. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांच्या स्मृतीस आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2015 1:19 pm

Web Title: mangesh padgaonkar passes away
Next Stories
1 सवलत रद्द करण्याचे स्वागतच
2 अपघातप्रवण आरटीओ !
3 मुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच ?
Just Now!
X