– चैतन्य प्रेम

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
baramati lok sabha seat, supriya sule, pawar surname, jitendra awhad, sharad pawar, ajit pawar, jitendra avhad criticise ajitdada, pawar surname, sunetra pawar, thane, bjp,
जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रिया सुळेंना राजकीय फायदा घ्यायचा असता तर…
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

‘मी’ आणि ‘माझे’च्या रोगानं अंत:करण व्यापलं आहे. माणसाची बुद्धी, मानसिक शक्ती आणि भौतिक बळ या ‘मी’ आणि ‘माझे’च्या जपणुकीसाठी कामी येत आहे. ‘मी’ म्हणजेच देह, हा भाव असल्यानं देहसुखालाच सर्वाधिक मोल आलं आहे. हा देह इंद्रियांनी युक्त आहे आणि प्रत्येक इंद्रियाद्वारे विषयजनित ‘सुख’ घेता येतं, असं माणसाला वाटतं. त्यामुळे देहबुद्धीला सुखावणाऱ्या गोष्टी पाहण्यात डोळे गुंतून जातात. देहभावाला आवडणारे शब्द उच्चारण्यात तसंच देहभावाला रुचणाऱ्या गोष्टींच्या सेवनात मुखाला स्वारस्य उरतं, देहसुख जोपासणारा स्पर्श त्वचेला भावतो. तर याप्रमाणे प्रत्येक इंद्रिय देहसुखाच्या ओढीनं विषयपाशात अडकतं. समर्थ म्हणतात की, ‘‘विषयजनित सुखे सौख्य होणार नाही!’’ म्हणजे विषयांच्या आधारावर तात्पुरतं ‘सुख’ जरूर मिळेल, पण कायमच्या सौख्याची काही हमी नाही! म्हणजे पाहणं हा डोळ्यांचा विषय आहे. डोळ्यांना नेत्रसुख घेता येईलही; पण जी गोष्ट पाहून आज आनंद वाटला, ती गोष्ट आज जशी आहे तशी कायमची राहणार नसल्यानं हे सुख सौख्यामध्ये रूपांतरित होईलच असं नाही. साधं उदाहरण घ्या. उत्तम प्रतीचे पेढे आणले. ते पाहूनच मन तृप्त झालं. ते तसेच ठेवून दिले आणि विसरून गेलो. चार-पाच दिवसांनी आठवण झाली. खोका उघडला तर ते काळवंडले होते. बुरशी लागलेली. आता आनंदाच्या जागी शिसारी आली! कधी कधी आसक्ती, एकांगी दुराग्रह, अहंकार आणि भ्रमाची बुरशी लागून, कधीकाळी प्रेममय भासणारी नातीसुद्धा अशीच कुजतात! ती सौख्यकारक उरत नाहीत. तेव्हा विषयांच्या जोरावर सुख मिळत असलं, तरी ते सुख घेणाऱ्यामध्ये काळानुरूप बदल होत असल्यानं ते सुख कायमचं टिकत नाही. पण त्या सुखाची मर्यादा जे जाणतात आणि म्हणून काळाच्या पकडीत असूनही कालातीत अशा उदात्त भावनांची जोड देतात, त्यांच्याच जीवनात या ‘सुखा’चं सौख्यात रूपांतर होतं. बहुतेकजण मात्र विषयप्रभावात सापडून, विषयसुखाची मर्यादा न जाणून आशेच्या खेळात अडकून अतृप्तीच्या काटेरी रस्त्यावर वणवण करीत आयुष्याचा बहुमोल वेळ वाया घालवत राहतात. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘नवल रोगाचा पडिपाडु। गोड परमार्थ तो जाला कडू। केवळ विषप्राय विषय कडू। तोचि गोडु पैं झाला।।१४।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय दहावा). नाथ महाराज म्हणतात की, ‘मी’ आणि ‘माझे’चा रोग असा भिनला, की गोड परमार्थ कडू वाटू लागला आणि विषप्राय असे कडू विषय गोड वाटू लागले! आणि त्यामुळेच अवधूत जरी पोटतिडकीनं सांगत असला की, ‘‘विषयसुखाचिये आसक्ती। कोणा नाहीं झाली तृप्ती। मृगजळाचिये प्राप्ती। केवीं निवती तृषार्त॥६४२॥’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा) म्हणजे विषयसुखानं कोणीही तृप्त झालेला नाही. मृगजळाचे साठे हाती आले तरी कोणी कधी तृप्त होईल का, कोणाची तहान शमेल का, असा प्रश्न अवधूत करीत असला तरीही मृगजळामागे धावणं काही थांबत नाही!

chaitanyprem@gmail.com