News Flash

१०२ वर्षीय आजोबांचे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान

आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठय़ा हिरिरीने त्यांनी मतदान केले.

राळेगाव येथील २१४ मतदान केंद्रावर पुखराज उमीचंद बोथरा यांचे मतदान विशेष आकर्षण ठरले.

अकोला : यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील राळेगाव येथील १०२ वर्षीय आजोबांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अनोखा विक्रम रचला. पुखराज उमीचंद बोथरा (१०२) यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावला. या वयातही ते आपले राष्ट्रीय कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याबद्दल प्रशासनाने त्यांचा गौरव केला.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव येथील २१४ मतदान केंद्रावर पुखराज उमीचंद बोथरा यांचे मतदान विशेष आकर्षण ठरले. स्वतंत्र भारताच्या १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीत पुखराज बोथरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठय़ा हिरिरीने त्यांनी मतदान केले. मतदानासाठीचा त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा होता.

त्यामुळे प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुखराज बोथरा यांचे स्वागत केले. बोथरा यांचा आदर्श सर्वानी घ्यायला हवा, असे हिंगे म्हणाले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 4:20 am

Web Title: 102 year old grandfather voted in every lok sabha election
Next Stories
1 राष्ट्रवादीची अनामत जप्त करा ; जयदत्त क्षीरसागर यांचा दणक्यात प्रचार
2 लातूरच्या साखरपट्टय़ात भाजप नेत्यांच्या सभेला गर्दी
3 बीडमध्ये शिवसंग्रामचा राष्ट्रवादीला पाठिंबा; भाजपला धक्का
Just Now!
X